आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्ती करताना शॉक लागल्याने वायरमनचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दुरुस्तीचे काम करीत असताना शॉक लागून पडल्यामुळे एका वायरमनचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ११.३० वाजता एमआयडीसीतील सेक्टरमध्ये ही घटना घडली. उत्तम जयराम पाटील (वय ५८, रा.एमआयडीसी) हे वीज वितरण कंपनीत शाखा क्रमांक मध्ये तंत्रज्ञ वायरमन पदावर कार्यरत होते. एमआयडीसीच्या सेक्टरमध्ये वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे गुरुवारी ते दुरुस्तीसाठी गेले होते. काम करीत असताना त्यांना शॉक लागल्यामुळे ते खाली कोसळले. नागरिकांनी त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान पाटील हे मनमिळावू कर्मचारी होते. पुढच्या वर्षीच ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली एक मुलगा असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...