आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात ‌उष्णतेच्या लाटेचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मान्सूनची उत्तरेकडे सुरू असलेली वाटचाल समाधानकारक असताना राज्यातील काही भाग उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून निघाला आहे. पूर्व विदर्भात असलेली उष्णतेची लाट विदर्भातील इतर जिल्हे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भागदेखील व्यापणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या आठवड्यात ही लाट अधिक सक्रिय होणार आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यात तापमान ४७ अंशांवर पोहोचले होते. ही स्थिती आणखी काही दिवस राहण्याची भीती आहे. जळगावातदेखील पारा ४४ अंशांवर पोहोचला आहे. त्यातच वाऱ्याचा वेग वाढल्याने उष्णतेच्या झळांनी जनजीवन विस्कळीत केले. येत्या आठवड्यात उष्णतेची लाट कायम राहिल्यास जळगावातही तापमान ४६ अंशांपुढे जाण्याची भीती आहे.

श्रीलंकेपासून पुढे सरकलेल्या नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा शुक्रवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. नैऋत्य मोसमी पावसाने उर्वरित अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग नैऋत्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असल्याचे हवामान विभागाने म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...