आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५ दिवसांत शिवसेनेचा वाघ बाहेर येईल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव शहरातील शिवसेना मजबूत झाली पाहिजे. तर येत्या पंधरा दिवसांत शिवसेेनेचा वाघ बाहेर येणार असून त्याची पुन्हा डरकाळी तुम्हाला एेकायला मिळणार असल्याचे वक्तव्य करत जळगाव शहर शिवसेनेचे संपर्कप्रमुख के. पी. नाईक यांनी माजी अामदार सुरेश जैन यांच्या सुटकेचे संकेत दिले अाहेत.

जळगाव शहर शिवसेनेच्या कार्यालयात रविवारी शिवसेना महानगरच्या मेळावा झाला. या वेळी नाईक बाेलत हाेते. शहरातील एकूण ७५ वाॅर्डांमध्ये शिवसेनेच्या शाखा अाहेत, तर कार्यकारिणीदेखील भक्कम अाहे. परंतु, अजूनही शहरात संघटन मजबूत करावे लागेल. शिवसैनिकांना ताकत देणारा वाघ लवकरच बाहेर येईल. ‘नाथ’ म्हणवणाऱ्यांचादेखील या वाघाकडून बंदाेबस्त हाेईल, असा इशारा नाईक यांनी दिला. दरम्यान, महानगरातील वाॅर्डनिहाय याद्या सादर करणाऱ्यांवर नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीला महानगर प्रमुख गणेश साेनवणे, कुलभूषण पाटील, शाेभा चाैधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...