आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within Two And Half Hour Municipality Budget Sanction

अडीच मिनिटांत मनपाचे बजेट मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने फेब्रुवारीत सादर केलेल्या ७३३ काेटी ९८ लाखांच्या अंदाजपत्रकात एक शब्दही बदलता खान्देश विकास अाघाडी मनसेने जशीच्या तशी मंजुरी देऊन टाकली. मालमत्तांच्या कराच्या मूल्यांकनात सुधारणा करण्यावर शिक्कामाेर्तब झाल्याने अाता जेवढी उंच इमारत रहिवास तेवढा कर भरावा लागणार अाहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेली ही दुरुस्ती सर्वसामान्यांसाठी मात्र छुपी करवाढच वाटतेय. अवघ्या अडीच मिनिटात अाटाेपलेल्या सभेत भाजपनेही बाजू मांडता अापला विराेध नाेंदवला.

महापालिकेचे २०१५-१६ या वित्तीय वर्षाचे सुधारित २०१६-१७ या वित्तीय वर्षाचे अपेक्षित उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रक १७ फेब्रुवारी राेजी अायुक्त संजय कापडणीस यांनी स्थायी समितीत सादर केले हाेते. त्या वेळेस अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभा तहकूब करण्यात अाली हाेती. त्यानंतर मनपातील राजकारणाला कलाटणी मिळाल्यामुळे तब्बल दाेन महिन्यांनी गुरुवारी सकाळी सभापती नितीन बरडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची तहकूब सभा घेण्यात अाली. यात ७३३ काेटी ९८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकात तीन काेटी ७६ लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात अाला. यात अमृत याेजनेसह स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठीही तरतूद केली अाहे. तसेच कर्जफेडीसाठी प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना सत्ताधाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला अाहे. सभेला अप्पर अायुक्त साजीदखान पठाण, उपायुक्त प्रदीप जगताप, राजेंद्र पाटील उपस्थित हाेते.

मनपात नगरपालिकेचा अनुभव
मनपास्थापनेपूर्वी नगरपालिकेच्या सभांमध्ये पाच मिनिटात २५ विषयांना मंजुरी देण्यात येत असे. अनेक नगरसेवक जिन्याच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना सभा अाटाेपल्याचा निराेप मिळत असे. असाच अनुभव बऱ्याच दिवसांनी स्थायी समितीच्या सभेत अाला. अंदाजपत्रक मंजुरीचा एकमेव विषय असल्याने खाविअाचे गटनेते गणेश बुधाे साेनवणे यांनी प्रशासनाने सादर केलेले अंदाजपत्रक जसेच्या तसे मंजूर करण्याची सूचना मांडली. त्याला ज्याेती इंगळे यांनी अनुमाेदन दिले. दुसऱ्या क्षणी भाजपच्या माजी सभापती ज्याेती चव्हाण यांनी अापला विराेध जाहीर करता अंदाजपत्रक बहुमताने मंजूर करा, असे सांगितले. त्यानंतर सभापती बरडे यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. अवघ्या अडीच मिनिटात पालिकेचे ७३३ काेटींचे अंदाजपत्रक मंजूर झाले. विशेष म्हणजे सभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे भाजप सदस्यांनीही अापल्या भावना व्यक्त करता शांत राहणे पसंत केले.

साेनवणेंचे प्रश्न अनुत्तरित
स्थायीसमितीच्या मागच्या सभेत भाजपचे सदस्य पृथ्वीराज साेनवणेंनी छुप्या करवाढीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांची गाेची केली हाेती. परंतु, वेळ मारून नेत पुढच्या सभेत चर्चा करू, असे सांगत विषय बदलला हाेता. परंतु, एेन अंदाजपत्रक मंजुरीच्या सभेलाच साेनवणेंची गैरहजेरी अनेकांना खटकली. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी बाहेरगावी असल्याने सभेला येता अाले नाही. परंतु, अामच्या पक्षाने छुप्या करवाढीला विराेध केला अाहे, असे सांगितले.

मालमत्ता करात हाेणार वाढ
जळगावशहरातील इमारतीत अातापर्यंत तळमजला १०० टक्के तसेच पहिला, दुसरा अाणि तिसरा मजला अनुक्रमे ७५ टक्के, ५० टक्के ५० टक्के अशी अाकारणी हाेत हाेती. याबाबत लेखापरीक्षणात २००३ पासून अाक्षेप नाेंदवण्यात येत हाेते. त्यामुळे अाता मालमत्ता कराचे याेग्य मूल्य निश्चित करताना मजलेनिहाय कराची अाकारणी केली जाणार अाहे. त्यामुळे पालिकेच्या महसुलात वाढ हाेईल. चालू वर्षापासून जेवढी माेठी उंच इमारत, त्यानुसार कराची अाकारणी हाेणार अाहे. यात लहान मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला असला तरी माेठ्या बांधकामांच्या कर अाकारणीत ४० टक्क्यांनी वाढ हाेणार अाहे.