आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Aadhar Card We Take Gas, News In Marathi

आधारकार्ड नसले तरीही मिळेल गॅसवरील अनुदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात जानेवारीपासून गॅस सिलिंडरच्या अनुदानासाठी डीबीटीएल योजना लागू केली जाणार आहे. याबाबतचे आदेश गॅस एजन्सींना बुधवारी प्राप्त झाले. यात आधारकार्ड नसलेल्या ग्राहकांनाही या योजनेतून अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

गॅस सिलिंडरवरील सबसिडीसाठी केंद्र शासनाने पुन्हा डीबीटीएल अर्थात थेट बँक खात्यात अनुदान जमा करण्याची योजना दोन टप्प्यात सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि गॅस वितरण कंपन्यांमध्येच संभ्रमावस्था होती. मात्र, बुधवारी स्पष्ट मार्गदर्शन मिळाल्याने योजनेतील अडचणी दूर झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात नागपूर वगळता महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांचा समावेश असेल. पहिला टप्पा १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

सबसिडीसाठी हे करा
ज्या ग्राहकांकडे आधारकार्ड असेल अशांनी आधार आपल्या बँकेला आणि एलपीजी डिस्ट्रीब्यूटर यांना द्यावे. जेणेकरून सबसिडीसाठी लिंकिंगची प्रक्रिया राबवता येईल.

*ज्यांच्याकडे आधार नसेल अशांनी बँक खाते क्रमांक आयएफएससी कोड गॅस वितरण एजन्सीला द्यावे. त्यानंतर गॅस एजन्सीकडील १७ अंकी डिजिटल क्रमांक आपल्या बँकेत सादर करावा.
*यापूर्वी लिंकिंग असलेल्या ग्राहकांना आता कुठलीच प्रक्रिया करण्याची गरज नाही.
डीबीटीएल योजनेविषयी स्पष्ट मार्गदर्शक सूचना बुधवारी प्राप्त झाल्या. त्यानुसार जनजागृतीपर हॅण्डबिले ग्राहकांना वाटण्यात येतील. या प्रक्रियेदरम्यान, दुसऱ्याच्या नावावर असलेले गॅस कनेक्शन स्वत:च्या नावे करून घेण्याची प्रक्रिया ग्राहकांना करता येणार आहे. दिलीप चाैबे, संचालक, रेखा गॅस एजन्सी