आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत, माती अन‌् पाण्याविना गच्चीवर भाजीपाल्याची शेती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: डाॅ. जे. बी. राजपूत यांच्या गच्चीवरील परसबागेत केळीच्या खांब्यावर फुलवण्यात अालेली शेती.
जळगाव - शेतातील टाकाऊ वस्तू म्हणून बांधावर फेकून देण्यात येणाऱ्या केळीच्या खांबात माती, पाणी अाणि खताशिवाय भाजीपाला पिकवण्याचा प्रयाेग डाॅ.जे.बी.राजपूत यांनी त्यांच्या परसबागेत केला अाहे. केळीच्या खांबामध्ये असलेले पाणी अाणि विविध अन्नद्रव्य उपयाेगात अाणून डाॅ.राजपूत यांनी परसबागेत चांगल्या प्रकारची मेथीची भाजी उगवली अाहे. अातापर्यंत टाकाऊ वस्तू म्हणून शेतकरी केळीचे खांब फेकून देत हाेते. काही ठिकाणी संशाेधना अंती केळीच्या खाेडापासून धागा बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात अाले अाहे. मात्र, त्याचा वापर सहज शक्य नसल्याने शेतकरी अजूनही शेताच्या बांधावर केळीचे खांब फेकून देतात. या खांबाचा उपयाेग करण्याच्या दृष्टीने डाॅ.राजपूत यांनी परसबागेत प्रयाेग करून पाहिला. त्यांनी खांबामध्ये कमी दिवसांत येणारी मेथी लावल्यानंतर ती सहज उगवली.

खांबातील घटकांचा उपयाेग
केळीच्याखांबामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असताे. खांबावर असलेला थर सछिद्र असल्याने बियाण्याची उगवण अाणि वाढ हाेण्यास तसेच मुळांना खाेलवर जाण्यास अडचण येत नाही. केळीचे पीक घेताना पिकाच्या पाेषणासाठी अावश्यक ते सर्व घटक, खते, अन्नद्रव्ये यांचा अंश खांबामध्ये असताे. खांब फेकून दिल्यामुळे वाया जाणारे खत अाणि अन्नद्रव्य मेथीसाठी उपयाेगी पडतात. खांब कापल्यानंतर ताे एका महिन्यापर्यंत अाेला असताे. त्यामुळे त्यात बियाणे उगवल्यानंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. एका उपयाेगात अाणलेल्या खांबाचे नंतर खत तयार करता येऊ शकते. परसबागेतील कुंड्यांमध्ये तुकडे करून टाकल्यास कुजून त्याचे चांगले खत तयार हाेऊ शकते.
सहज करता येणे शक्य
केळीच्या खांबाचा चांगला उपयाेग करता येऊ शकताे. बांधावर फेकून दिलेल्या खांबावर शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे एक पीक घेता येऊ शकते. त्यासाठी पाणी अथवा इतर खते देण्याची गरज नाही. तर असाच प्रयाेग करुन सुंदर गार्डनमध्ये फुलझाडे भाजी पिकवता येईल. डाॅ.जे.बी.राजपूत,हृदयराेगतज्ज्ञ

अशी केली लागवड
डाॅ.राजपूत यांनी केळीचे खांब परसबागेत अाणि गच्चीवर ठेवले अाहेत. खांबाच्या दाेन्ही बाजू कापले असल्याने खांबातील पाणी बाहेर जाऊ नये, म्हणून त्याला मातीचा लेप लावला अाहे. त्यानंतर खांब्यात खड्डे करून त्यात मेथीचे रात्रभर पाण्यात भिजवलेले बियाणे टाकले. बियाणे उघडे दिसू नये म्हणून खड्डा बुजवण्यासाठी थाेडे काेकाेपीट वापरले. तीन दिवसांनंतर खांबातून मेथीचे बी उगवले. १० ते १२ दिवसांत मेथीची पूर्ण वाढ झाली. विशेष म्हणजे या मेथीवर काेणतेही राेगराई नाही. किंबहुना मेथीला काेणतेही खत दिले नाही.
बातम्या आणखी आहेत...