आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Stopping Leakage Free Loadshading Not Possible In Jalgaon City

जळगाव शहरात गळती कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय भारनियमनमुक्ती अशक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील भारनियमनमुक्तीसाठी वसुलीचे उद्दिष्ट 140 टक्के पूर्ण होणे आवश्यक आहे; मात्र अद्याप ते 92.8 टक्केच पूर्ण झाले आहे. काही विशिष्ट भाग वगळता वसुली वाढवून गळती कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय भारनियमनमुक्ती अशक्य आहे. वीज ग्राहकांनी याकामी सहकार्य केल्यास या उन्हाळ्यात शहर भारनियमनमुक्त करण्यासाठी क्रॉम्प्टन प्रयत्नशील राहणार आहे. दरम्यान, फीडरनिहाय भारनियमनासाठी कंपनीने वसुली व बिल थकलेल्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम वेगाने सुरू केली आहे. त्यात शासकीय कार्यालये, पाणीपुरवठा, थकित घरगुतीसह व्यावसायिक ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात असल्याची माहिती क्रॉम्प्टनचे युनिट हेड डॉ. विजयकुमार सोनवणे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

महावितरण कंपनीदरम्यानची प्रलंबित प्रकरणे निकाली
महावितरण कंपनी कार्यरत असल्यापासून प्रलंबित असलेली विजेची प्रकरणे कंपनीकडून निकाली काढण्याचे काम सुरू आहे. वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. महावितरणकडून वीज विकत घेऊन ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात पुरवठादार म्हणून कंपनी काम करत आहे. वापरलेल्या विजेचे बिल वेळेत भरल्यानंतरच ग्राहकाला पुरेशी वीज मागण्याचा हक्क प्राप्त होतो; मात्र हा हक्क असणार्‍यांचे प्रमाण कमी आहे. उर्वरित बिले भरण्यास टाळाटाळ व विलंब होत असल्याने प्रामाणिक ग्राहकांना आपल्या हक्कापासून दूर राहावे लागत आहे. शहरात सुमारे 10 कोटी रुपये थकित आहेत. वीजबिलांविषयीच्या तक्रारी तत्काळ निकाली काढल्या जात असल्या तरी, वसुलीचे प्रमाण वाढत नसल्याचे डॉ.सोनवणे यांनी सांगितले.

कटू कारवाई करणे अटळ
आकड्यांसह घरातील वीज उपकरणांची तपासणीही या पथकाकडून केली जात आहे. त्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत कंपनीने ‘गांधीगिरी’ करून वसुलीचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता 135 व 126 कलमांतर्गत कटू कारवाई करणे अटळ असल्याचेही डॉ.सोनवणे यांनी सांगितले.