आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्ड्यावर धाड; मिळाली गावठी दारू, महिला, तरुणाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
जळगाव - शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना बुधवारी दुपारी १२ वाजता मिळाली. त्यानुसार धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकाला जुगार ऐवजी अवैधरित्या गावठी हातभट्टी देशी दारू विक्री करणारे दोघे सापडले.
 
पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले तसेच पोलिस उपनिरीक्षक पवन राठोड, मिलिंद कंक, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, अनिल धांडे, सुनीता इंधाते, नरेंद्र ठाकरे यांच्या पथकाने झिपरू अण्णानगर गाठले. त्या वेळी सरला संतोष पवार ही अवैधरित्या गावठी दारू विक्री करत असताना मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी सरला पवार हिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याजवळ १२ हजार ६०० रुपये किमतीच्या कॅन गावठी दारू तसेच हजार ५०० रुपये किमतीच्या देशीदारूच्या ६९ बाटल्या मिळून आल्या असून कॅन बाटल्या पोलिसांनी जप्त केले आहेत.

यानंतर पोलिसांनी वाल्मीकनगरात छापा मारला असता, त्या ठिकाणी राजेंद्र नारायण सोनवणे हा तरुण गावठी दारू विक्री करताना मिळून आला. दरम्यान, त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना 3 हजार रुपये किमतीची दोन कॅन दारू मिळून आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...