आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार मालकाविरुद्ध महिलेसह नगरसेविकेचा रात्री 11.15 वाजता पाेलिस ठाण्यात 2 तास ठिय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शास्त्री नगरातील सनशाईन हाॅटेल मालकाने दारूच्या नशेत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे हाॅटेल मालाकाला त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी हाॅटेल शेजारी राहणाऱ्या शशिकला चाैधरी यांनी त्याच्या दाेन मुलांसह रविवारी रात्री ९.१५ वाजेपासून ते ११.१५ वाजेपर्यंत रामानंद पाेलिस ठाण्यात ठिय्या अांदाेलन केले. या अांदाेलनात नगरसेविका उज्ज्वला बेंडाळेदेखील सहभागी झाल्या हाेत्या. 

 

महिनाभरापासून हॉटेल सनराईज शेजारी राहणाऱ्या ६५ वर्षीय शशिकला संताेष चाैधरी यांच्या कुटुंबीयांना हाॅटेलमध्ये येणाऱ्या दारुड्यांचा त्रास हाेत अाहे. रविवारी रात्री वाजता वाहन लावण्यास मनाई केल्याने दारूच्या नशेत असलेल्या हॉटेल मालक रवींद्र सुधाकर जगताप याने शशिकला चाैधरी यांना त्यांचा मुलगा मनाेज याला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी रॉड घेऊन अंगावर धावून गेल्याचे रामानंद पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे. या घटनेनंतर चाैधरी कुटुंब वॉर्डाच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी हाॅटेल मालकाला अटक करण्याची मागणी करत रामानंद पाेलिस ठाण्यात ठिय्या अांदाेलन केले. या वेळी पाेलिस निरीक्षक बी. जे. राेहम यांनी कारवाई करण्याचे अाश्वासन दिल्यानंतर अांदाेलन मागे घेण्यात अाले. 

बातम्या आणखी आहेत...