आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Died In LPG Gas Explosion At Chalisgaon Taluka

चाळीसगाव तालुक्यात गॅसच्या स्फोटामध्‍ये महिला ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - तालुक्यातील पिंपरखेड येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली. स्फोटाने किरकोळ आग लागली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पर्शिम घेतले.

मंगलबाई ईश्वर अहिरे (वय 27) असे या महिलेचे नाव आहे. ती गॅस पेटवत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार नातेवाइकांच्या लग्नासाठी नाशिक येथून दोन दिवसांपूर्वी ही महिला पिंपरखेडला आपल्या सासरी आली होती.

चाळीसगाव येथे शनिवारी हळदीचा कार्यक्र म आटोपून पिंपरखेड येथे ती पाच वाजेच्या दरम्यान पतीच्या सांगण्यावरून गेली होती. घरी वयोवृध्द सासरेच होते. गॅस पेटविण्याचा प्रयत्न करीत असतांना अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. पतीसह ती नाशिक येथे त्या वास्तव्याला होती. या घटनेमुळे पिंपरखेड गावासह चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.