आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Dies After Ticket Checker Pushes Her Off A Train In Maharashtra

अर्जुन पुरस्कारप्राप्त टीसीचे \'दुर्योधन\' कृत्य; धावत्या रेल्वेतून महिलेला ढकलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव येथील एका अर्जुन पुरस्कारप्राप्त तिकिट निरीक्षकाने (टीसी) 'दुर्योधन' कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी टीसी भारत साळुंखे याने धावत्या रेल्वेतून महिला प्रवाशाला खाली ढकलले. यात महिला प्रवाशीचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक- राजेंद्रनगर पाटणा एक्स्प्रेसमध्ये (13202) गुरुवारी सकाळी ही घटना घडली. जळगाव स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर ही दुर्घटना घडली. आरोपी भारत सालुंखे याने कुस्ती क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार प्राप्त केला होता.
उज्ज्वला पांडे (वय-38) असे या महिलेचे नाव असून आपल्या मुलीसोबत त्या मध्य प्रदेशात जात होत्या. स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतर उज्ज्वला पांडे धावपळीत एसी डब्यात चढत असल्याना टीसी भारत साळुंखे याने त्यांना धक्का दिला. पांडे रेल्वे खाली कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याच पांडे यांच्या कुटूंबियांनी सांगितले.

जीआरपीने मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.