आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कार झाल्याचा दावा करणारी महिला बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्वत: वर बलात्कार झाल्याचा दावा करत शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेली २५वर्षीय महिला रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कुणाला काहीही सांगता रुग्णालयातून निघून (अॅबस्कॉन्ड) गेली.

जिल्हापेठेतील ४५ नंबर शाळेच्या परिसरात आपल्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप करून किरकोळ जखमी अवस्थेतील या महिलेला महिलांच्या वॉर्डमध्ये दाखल केले होते. मात्र, रविवारी सकाळी ती निघून गेल्याची नोंद सामान्य रुग्णालयाच्या रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. संबंधित महिलेचा जबाब घेण्यात आला नव्हता.