आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीजेसाठी दाेन लाख रुपये अाणल्याने विवाहितेचा छळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- लग्नात मानपान दिला नाही डीजेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून दाेन लाख रुपये आणल्याने धुळे तालुक्यातील मोराणे प्र.ल. येथील विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध धुळे तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

याबाबत ज्योती जितेंद्र सोनवणे (वय २७, रा. मोराणगाव, सुरत ह.मु. मोराणे प्र.ल, ता. धुळे) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डीजेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून दाेन लाख रुपये आणावे, अशी मागणी सासरच्यांनी केली. पैसे आणले नाही लग्नात मानपान दिला नाही या कारणावरून पतीसह पाच जणांनी शारीरिक मानसिक छळ केला. तसेच अंगावरील स्त्रीधन काढून घेतले. शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. नांदण्यास आली तर विष पाजून मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०१३ ते २६ मार्च २०१६ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार जितेंद्र भाईदास सोनवणे, चंदनबाई भाईदास सोनवणे, भाऊसाहेब भाईदास सोनवणे, आशाबाई दीपक सोनवणे, सुलोचना श्रीकांत सोनवणे (सर्व रा. तोरखेडा, ता. शिंदखेडा) यांच्याविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...