आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कैदी झरिना तडवीला आला होता "व्हेटो व्हेगल अ‍ॅटॅक'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कारागृहात गुरुवारी दुपारी बायजाबाई बारेला हिने गळफास घेतल्याचे पाहून दुसरी महिला कैदी झरिना तडवी ही बेशुद्ध पडली होती. तिला ‘व्हेटाे व्हेगल अ‍ॅटॅक’ आल्याने ती बेशुद्ध झाली होती. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सिव्हिलचे वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय बिराजदार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

पतीचा खून केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळालेली बायजाबाई बारेला या महिला कैद्याने गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता कारागृहाच्या शौचालयाच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह पाहून दुसरी महिला कैदी झरिना लुकमान तडवी हिला हृदयाचा ‘व्हेटो व्हेगल अ‍ॅटॅक’ आल्याने ती बेशुद्ध झाली होती. त्यामुळे तिला उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असून जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव यांनी सांिगतले.

बायजाबाईचे धुळ्यात शवविच्छेदन
आत्महत्या केलेल्या बायजाबाई बारेला या महिला बंदिवानाचे शुक्रवारी धुळ्यात जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया इन कॅमेरा करण्यात आली आहे. शासकीय नियमानुसार या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

‘व्हेटाेव्हेगल अ‍ॅटॅक’ म्हणजे काय?
अचानकएखादे भयावह दृष्य पाहिल्यानंतर घाबरल्याने येणारा झटका म्हणजे ‘व्हेटाे व्हेगल अ‍ॅटॅक’ हाेय. हा झटका काेणालाही येऊ शकताे. मात्र, ताे आल्यावर घाबरून जाता, संबंधिताच्या ताेंडावर पाणी मारणे, त्याचे कपडे सैल करणे आणि त्याचे पाय वर करून डाेके खाली करावे. त्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत हाेऊन संबंधित रुग्ण पूर्वपदावर येत असल्याचे जिल्हा रुग्णालयाचे फिजिशियन डाॅ.दत्तात्रेय बिराजदार यांनी सांगितले.

(फोटो : जिल्हा कारागृहातून बाहेर पडताना जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टरांचे पथक.)
बातम्या आणखी आहेत...