आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सासरी जाचामुळे गर्भवतीची गळफास घेऊन अात्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तीन मुलींच्या पाठीवर मुलगा पाहिजे, यासाठी महिलेला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात हाेता. या त्रासाला कंटाळून आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या या महिलेने शनिवारी रात्री उशिरा गळफास घेऊन अात्महत्या केली.

रावेर तालुक्यातील मांगलवाडी येथील रेखा नीलेश सपकाळे (वय २८) हिचे सन २०१० मध्ये बांभोरी येथील नीलेश गोकुळ सपकाळे (वय ३२) याच्याशी लग्न झाले. त्यांना प्रियंका (वय ५), जागृती (वय ४), राधिका (वय २) या तीन मुली झाल्या. मात्र, सासरच्या मंडळींना वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगाच हवा हाेता. त्यामुळे रेखा हिला अनेक दिवसांपासून शारीरिक, मानसिक त्रास दिला जात हाेता. याबाबत रेखा यांनी माहेरच्या मंडळींना माहिती दिली. त्या वेळी वडील दिलीप रघुनाथ तायडे, आई सुनंदा तायडे, भाऊ जगदीश तायडे, राहुल तायडे, बहिण छाया यांनी रेखाला समजावून सांगितले. सासरच्या मंडळींशी बाेलून वाद मिटवण्यात अाला हाेता, त्यानंतर रेखा पुन्हा बांभाेरी येथे पतीकडे अाली. या दरम्यान, तिला गर्भधारणा झाली. मात्र चाैथ्यांदा गर्भवती राहिलेल्या रेखाला अाताही मुलगीच हाेणार असल्याचा संशय पती नीलेश, जेठ राकेश गोकुळ सपकाळे, सासू मीराबाई गोकुळ सपकाळे, सासरा गोकुळ आत्माराम सपकाळे यांना आला. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी तिच्यावर बळजबरी केली जात हाेती. मात्र, तिने गर्भपातास नकार दिल्याने सासरच्या मंडळींकडून दरराेज तिला शिवीगाळ, मारहाण केली जात हाेती, असा अाराेप मृत रेखाच्या माहेरच्या मंडळींनी केला अाहे.

हा जाच थांबवण्यासाठी भाऊ जगदीश तायडे याने रेखाचा पती नीलेश याला एक ट्रकही घेऊन दिला हाेता. दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नीलेश हा मद्यधुंद अवस्थेत घरी अाला. त्या वेळी त्याने रेखाला बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असतानाच रेखा हिने तिचा भाऊ जगदीश याला फाेन करून माहेरी घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र रात्र खूप झाल्याने रविवारी सकाळी येतो, असे त्याने सांगितले. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जगदीश यांना रेखा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन अाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे.

सासरच्यांकडून घातपात; महिलेच्या भावाचा अाराेप
रेखाने अात्महत्या केल्याचे समजल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळीने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. अापल्या बहिणीने अात्महत्या केली नव्हे तर सासरच्या मंडळींनी तिचा घातपात केला, असा अाराेप रेखाचा भाऊ जगदीशने केला. तसेच अाराेपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाइकांनी केली. गुन्हा दाखल हाेत नाही ताेपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याचे सांगितल्यावर तणाव निर्माण झाला हाेता. पाेलिसांनी मध्यस्थी करून अंत्यसंस्कार झाल्यानंतर फिर्याद देण्यास सांगितले. त्यानंतर रेखाच्या माहेरची मंडळी तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मांगलवाडी येथे घेऊन गेले.
बातम्या आणखी आहेत...