आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा तुरुंगात गळफास; मृतदेह चार तास लटकला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पतीचा खून केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्याने गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता जिल्हा कारागृहाच्या शाैचालयाच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे जिल्हा कारागृहाच्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आत्महत्येची घटना घडल्यानंतर सुमारे पावणेचार तास या महिलेचा मृतदेह तुरुंगात लटकलेल्या अवस्थेतच हाेता. या प्रकारामुळे पुन्हा एकदा जिल्हा कारागृहाचा भाेंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

जानेवारी २०१५मध्ये पतीवर कुऱ्हाडीने वार केल्यामुळे गाेरगावले (ता.चाेपडा) येथील बायजाबाई उर्फ बिनाबाई राजाराम बारेला हिच्यावर चोपडा ग्रामीण रुग्णालयात गुन्हा दाखल झाला हाेता. १९ जानेवारीला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तसेच मानसिक संतुलन िबघडल्याने तिच्यावर सध्या उपचारही सुरू होते. गुरुवारी दुपारी ते या वेळेत सर्व कैद्यांना बराकीतून बाहेर काढल्यानंतर बायजाबाई शाैचालयाचे नाव सांगून बराकीच्या मागील शाैचालयाकडे गेली. शौचालयातील खिडकीच्या गजाला अंगावरील साडी गुंडाळून गळफास घेतला. १० मिनिटांनंतर बायजाबाईसोबत असलेल्या दुसरी महिला कैदी झरिना लुकमान तडवी हिने सर्वप्रथम ही घटना पाहिली. त्यामुळे झरिना चक्कर येऊन बेशुध्द पडली. त्यानंतर सर्वच महिला कैद्यांनी एकच आरडा-ओरड केली. महिला कैद्यांच्या गाेंधळामुळे कारागृहाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बराकीकडे धाव घेतली.

कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. खात्री केल्यानंतर डाबेराव यांनी ४५ मिनिटांनी म्हणजेच दुपारी ४.३० वाजता तहसीलदार गोविंद शिंदे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली. रात्री ७.१५ वाजता जिल्हापेठ पोलिसांचे पथक कारागृहात दाखल झाले. त्याच्यापाठाेपाठ तहसीलदारदेखील कारागृहात आले. ह्या सर्व प्रक्रियेत सुमारे तास ४५ मिनीटे उलटून गेले होते. ताेपर्यंत मृतदेह िखडकीलाच लटकलेल्या अवस्थेत हाेता. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर
कारागृहअनेक घटनांमुळे बदनाम आहे. महिन्यांपूर्वी न्यायालयीन कैदतील भगवान हटकरचा मृत्यू झाला होता. मद्य पिण्यासाठी त्याला रक्षकानेच मदत केल्याचे उघड झाले होते. प्रशांत सोनवणे खून खटल्यातील आरोपी कैलास सोनवणे हे कारागृहात असताना त्यांना दुचाकीने न्यायालयात आणण्यात आले होते. केटामाइनमधील आरोपी रजनिश ठाकूर यांनीही मद्यपान केल्याचे उघड झाले होते.

महिलारक्षक मिळत नसल्याने अडचण
झरिनालासिव्हिलमध्ये दाखल केल्याने ितच्या सुरक्षेसाठी सोनाली तावडे या गार्ड रुग्णालयात थांबल्या हाेत्या. त्यामुळे कारागृहात महिला रक्षकाची चणचण भासू लागल्याने डाबेराव यांनी पोलिस मुख्यालयात फोन केला पण त्यांचा काही उपयाेग झाला नाही.

न्यायाधीशांनी साधला संवाद
कारागृहातगुरुवारी न्यायालय भरवले जाते. त्यासाठी मुख्यन्यायदंडाधिकारी संजय कुळकर्णी हे गुरुवारी ११ ते वाजेदरम्यान कारागृहात होते. तेथून जाण्यापूर्वी त्यांनी बायजाबाईची विचारपूसही केली होती.

बायजाबाईयांना दाेन मुले
मृत बायजाबाईला पाच वर्षांची दोन मुले आहेत. दोन्ही मुले त्यांच्या सासऱ्याकडे आहेत. लहान मुलाचे वय कमी असल्यामुळे त्याला जिल्हा कारागृहात आणण्यासाठी बायजाबाई यांनी खूप प्रयत्न केले हाेते पण त्याचा काही फायदा झाला नाही.

सीआयडी येऊनही झाला नाही फायदा
कारागृहात सायंकाळी वाजता सीआयडीचे स्थानिक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे दाखल झाले. प्राथमिक माहिती घेऊन अर्ध्या तासाने ते निघून गेले. घटना घडल्यानंतरही बराच वेळ पंचनामा झाला नव्हता. त्यामुळे गायकवाड यांच्या पथकाला ठोस माहितीही मिळू शकली नाही. त्यांना नाईलाजास्तव निघून जावे लागले.

(फोटो : जिल्हा कारागृहातून बाहेर पडताना जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टरांचे पथक.)