आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायलेकासह दाेन मुलींची विहिरीत उडी घेऊन अात्महत्या; पारोळा तालुक्‍यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाराेळा - तालुक्यातील तामसवाडी येथे महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून व चारित्र्यावर संशय घेतल्याने एक मुलगा व दाेन मुलींसह विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.  
 
सरला सुभाष काेळी (वय ३०) ह्या महिलेचे सासर वलवाडी येथील असून, ती परिवारासह अाठ ते दहा वर्षांपासून तामसवाडी येथे राहत हाेती. ते सहकुटुंब साेमेश्वर येथे ऊसताेडणीसाठी गेलेले हाेते. पाच दिवसांपूर्वीच ते तामसवाडीत अाले हाेते. पती सुभाष काेळी याला दारूचे व्यसन हाेेते. त्याने बैल विकून त्यातून मिळालेल्या पैशांची दारू पिऊन गेला. ताे पत्नी सरलाला मारहाण करून चारित्र्यावर संशय घेत असे. असे प्रकार वारंवार घडत हाेते. त्यामुळे ताे कर्जबाजारी झालेला हाेता. 
 
मंगळवारीदेखील त्याने सरलाशी भांडण करून चारित्र्यावर संशय घेतला. दाेघांमधील वाद टाेकाला जाऊन सरलाने नैराश्यातून मुलगी प्रियंका काेळी (वय ७), पायल काेळी (वय ४) व मुलगा कृष्णा काेळी (वय १) या बालकांसह मंगळवारी वसंत अर्जुन पाटील यांच्या विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. सुदैवाने त्यांची तिसरी मुलगी काजल ही शाळेत गेलेली हाेती. त्यामुळे ती वाचली. शेतातील  मजूर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेला असता, हा प्रकार त्याच्या लक्षात अाला. अथक परिश्रमानंतर मुले आणि महिलेचे पार्थिव  बाहेर काढण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...