आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीष महाजनांच्या महिलांबद्दलच्या विधानाचे तीव्र पडसाद; राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/नाशिक- राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दारू विक्रीची वाढ होण्यासाठी महिलांची नावे दारूच्या ब्रॅण्ड ला द्या, या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत.  राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे ठिकठिकाणी जोडो मारो आंदोलन करण्यात आले. 

जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीने GM टँगो ब्रँड असे नाव द्या असा उपरोधिक सल्ला देत गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस नाशिकच्या शहराध्यक्षा अनिता भामरेंसह कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. यावेळी गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी पालकमंत्र्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या. दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे देणाऱ्या गिरीश महाजन यांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. महिलांसाठी हेच का अच्छे दिन असा सवाल करीत या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. महिलांचा आदर करता येत नसेल तर अनादर तरी करू नका. भाजपची हीच शिस्त का? असा सवालही यावेळी महिलांनी केला. 
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि व्हिडिओ
 
 
बातम्या आणखी आहेत...