आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारादरम्यान महिलेचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोज दयाराम चौधरी यांच्या प्रचारादरम्यान दुपारी अचानक त्रास होत असल्याने त्यांच्या नातलग महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. वर्षा बारसू नारखेडे (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या उमेदवार चौधरी यांच्या पत्नीच्या मोठ्या भगिनी आहेत. चौधरी यांच्या प्रचार कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्षा नारखेडे या नेहमीप्रमाणे योगेश्वरनगर परिसरात प्रचार करीत असताना दुपारी वाजेच्या सुमारास त्यांना भोवळ अाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना जवळच्या डॉक्टरकडे नेले. मात्र, प्रकृती खराब झाल्याने त्यांना ऑर्किड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत वर्षा यांचे पती बारसू नारखेडे हे शनिपेठ पाेलिस ठाण्यात हेड काॅन्स्टेबल आहेत. साळवा (ता. धरणगाव) येथे त्यांच्यावर गुरुवारी सकाळी वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.