आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा केला विनयभंग; तिघांवर तलवार हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - तालुक्यातील वरखेडे कुंडाणे येथील विवाहितेशी अंगलट करून तिचा विनयभंग करण्यात आला. या वेळी स्वत:च्या बचावासाठी महिलेने चापट मारल्यामुळे संतप्त झालेल्या अविनाश पाटील इतरांनी महिला तिच्या कुटुंबीयांवर तलवारीने हल्ला केला. गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेबद्दल तिघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तर दोषींना कडक शासन करावे, अशी मागणी भाजपच्या युवती सभेने पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांना केली आहे. 
 
याबाबत २५ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंगणात स्वच्छता करत होती. याचवेळी अविनाश जहागीरदार पाटील हा आला. त्याने महिलेबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे संतप्त महिलेने त्याच्या कानशिलात मारली. याचा राग आल्यामुळे संतप्त झालेल्या अविनाशने महिलेशी अंगलट केली. यानंतर तलवार आणून महिलेवर उगारली. या वेळी महिलेचा पती सासरा यांच्यावरही वार करण्यात आले. अविनाश यांच्यासह दंगल सीताराम पाटील, सुरेश दंगल पाटील, नितीन दंगल पाटील यांनीही मारहाण केली, अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
या घटनेबद्दल भाजप युवती सभेने पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांना सायंकाळी निवेदन दिले. या वेळी माजी महापौर जयश्री अहिरराव, भारती माळी, प्रतिभा चौधरी, रत्ना बडगुजर, वैशाली शिरसाठ उपस्थित होते. दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...