आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Atrocities Against Jain Women News In Marathi

महिला अत्याचाराविरुद्ध जैन महिलांचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजातील विकृती नष्ट होईल, असा सूर ‘महिलांवर होणारे अत्याचार व उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला. दरम्यान, समाजातील विकृती नष्ट करण्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचा निर्णय जैन महिला मंडळाने घेतला आहे.
मनातील विकृती नष्ट केल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. इंटरनेट व मोबाइल आदी तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून योग्य-अयोग्य बाबींचा बोध मुलांना करवून देणे आवश्यक आहे. दोषीला शिक्षा करणे हा त्यावरील उपाय नाही, तर त्याचे मनपरिवर्तन करणे आवश्यक आहे.

श्रुतनिधीजी म्हणाल्या
आई-वडिलांनी मुलांमध्ये समन्वय ठेवायला हवा. हल्ली स्पर्धांमुळे ताण-तणाव वाढला आहे. त्यासाठी समुपदेशन करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. बहुतांश पालक मुलांमधील समस्या लपवून ठेवतात. त्याकडे वेळेवर लक्ष दिल्यास विकृत प्रकार होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.

नीलिमा सेठिया
समाजात विकृती व व्यसनाधीनता वाढल्यामुळेच मुली-महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे महिला व मुलींनी स्वत:मध्ये विश्वास निर्माण करायला हवा. महिलांमध्ये प्रतिकार करण्याचे बळ असावे.

निवेदिता ताठे
समाजाने आता मानसिकता बदलवण्याची आवश्यकता आहे. तसेच चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव प्रत्येक पालकाने मुलांना करून दिली पाहिजे.

दीप्ती अग्रवाल
मुलांवर चांगले संस्कार झाल्यास ते वाईट प्रवृत्तींना बळी पडणार नाहीत. तसेच मोबाइल व इंटरनेटपासून मुलांना अल्पकाळ लांब ठेवता येईल, मात्र, कायमस्वरूपी ठेवणे अशक्य आहे.
पालकांना मार्गदर्शन
महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, त्यावर नियंत्रण आणणे काळाची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर जैन महिला मंडळातर्फे सामाजिक संघटना, शाळांच्या शिक्षिका आणि पालकांसाठी शनिवारी चर्चासत्र घेण्यात आले. व्यासपीठावर सोनल गांधी, र्शद्धानिधीजी, र्शुतनिधीजी, र्शीनिधीजी उपस्थित होत्या. समाजाने स्वत: बदलून समाजातील विकृती नष्ट करण्यासाठी उपाय योजण्याची गरज आहे, असा सूर या वेळी मान्यवरांच्या मनोगतातून निघाला.

आपलं घर सांभाळलं तरी पुष्कळ. समाजाचा विचार करण्याची गरज नाही. ‘लैगिक शिक्षण’ हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पुढे आणला आहे. यामुळे देशाची संस्कृती धुळीला मिळणार आहे.
अत्याचार अथवा दबावाला बळी न पडता प्रत्येक मुलीने प्रतिकार करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक शाळेत समन्वय केंद्र असावे. नीता जैन म्हणाल्या की, मोबाइल व इंटरनेटमुळे मुले बिघडत आहेत. त्यामुळे शाळेत मुलांना मोबाइल वापरू देता कामा नये. दंडात्मक कारवाई करायला हवी.
शांता वाणी
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उत्तम कौटुंबिक संस्कार उपयुक्त ठरतील. तथापि, विकृतींना केवळ पुरुषच जबाबदार नाहीत, तर महिलांनीही याबाबत भान ठेवायला हवे. तसेच मुलांकडे लहानपणापासून लक्ष द्यायला हवे.
लहान मुले वरिष्ठांचे अनुकरण करत असतात. मोठय़ांनी शिस्त पाळावी. मात्र, मुलांचे मानसिक संतुलन बिघडणार नाही याची काळजी घेऊन मुलांवर चांगले संस्कार करणे अत्यावश्यक आहे.
सुरेखा शिवरामे
स्वत: सुधारल्यास समाज आपोआप सुधारेल. सध्या परिस्थिती बदलल्याच्या नावाखाली मुलींना कमी कपडे घालण्याची परवानगी दिली जाते. एवढेच नव्हे, तर आपण लहान मुलींचे कपडेही ‘फॅशनेबल’ घेतो. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यावा. समाजाला दोष न देता आपणच बदल करावा.
कमलेश वासवाणी