आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळून महिलांनी लुटला आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ब्राह्मणसभेच्या महिला समितीतर्फे बुधवारी बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत मंगळागगौरी हरतालिकेनिमित्त कार्यक्रम झाले. यानिमित्त महिलांनी 'झिम्मा गं पोरी,झिम्मा गं पोरी झिम्मा...’ म्हणत पारंपरिक खेळ बहारदारपणे सादर केले. संजीवनी ग्रुपच्या संचालिका विंदा नाईक त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध प्रकारचे खेळ खेळले.
विजया वैद्य, रेखा कुळकर्णी, स्वप्नगंधा जोशी यांचे या वेळी सत्कार करण्यात आले.विद्या धर्माधिकारी उपस्थित होत्या. उषा पाठक, शोभा कुळकर्णी यांचे कार्यक्रमास सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन मृणाल मदाने यांनी केले. हरतालिका गुरुवारी साजरी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर हरतालिकेचे आवरण हा कार्यक्रम घेण्यात आला. उपवासामुळे हरतालिकेचे जागरण करू शकणाऱ्या महिलांसाठी यावेळी हरतालिकेचे आवरण कार्यक्रम घेण्यात आला.
मनोरंजनात्मक अन‌् प्रबोधनात्मक खेळ
प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक खेळांचे सादरीकरण करण्यात अाले. या वेळी अडवळधूम, पडवळधूम, पद‌्मासन, कोंबडा, ताकाच्या रवीसारखे खेळ खेळले गेले. दाेन तासांच्या कार्यक्रमात कथेच्या स्वरुपात खेळ दाखवण्यात आले. घरात पूर्वी कशाप्रकारे महिला काम करायच्या, त्या स्वयंपाकाच्या साहित्यांचा वापर करून खेळ दाखवण्यात अाला. यात फुगडीमधील बैठा, दंड, एकहात, केरसुणी हे प्रकार सादर झाले.