आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्‍ह्यात महिलांची सुरक्षा धोक्यात , २०१३पेक्षा २०१४मध्ये महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणायचे ब्रीद’ घेऊन काम करणाऱ्या पोलिसांकडून महिला सुरक्षेच्या बाबतीत मात्र अपेक्षित काम होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सध्या राज्यभर महिला सुरक्षेचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. जिल्ह्यात २०१३मध्ये ५८ बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. तर २०१४मध्ये हा आकडा वाढून ६६वर पोहोचला. २०१३मध्ये २३८ तर २०१४मध्ये ३४७ िवनयभंगांच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळावे, म्हणून स्थानिक पोलिसांना महिला दक्षता समिती, महिला बाल साहाय्य कक्ष यांच्या माध्यमातूनही मदत केली जाते. मात्र, दिवसेंदिवस यात वाढ होत चालली असल्याने जिल्‍ह्यात महिला सुरक्षित नसल्याचेच बोलले जात आहे.

या आहेत घटना
घटना२०१३ २०१४
खून७८ ८२
दरोडा ३८ ४५
जबरी चोरी ११४ १२९
चोरी ९७६ ९९९
दंगा ३०३ ३४५

अनेक घटना पोलिसात जातच नाही
रस्त्यावर,बाजारात, शाळा, कॉलेजात अनेक वेळा महिला, मुलींची छेड काढली जाते. पण बदनामी नको, म्हणून संबंधित महिला तक्रार करत नसल्याने या घटना पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. परिणामी टवाळखोरांचे चांगलेच फावते. निर्भया पथकाच्या माध्यमातून या घटनांवर अंकुश लावण्याचे काम सुरू आहे.

कायदा अन् सुव्यवस्था आली धोक्यात
२०१३२०१४ या दोन वर्षांत खून, दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी आणि दंगा या घटनांचे आकडे वाढले आहेत. खून, दंगल या घटनांमुळे अनेक वेळा कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्या आहेत. तर चोरी आणि सोनसाखळीवर नियंत्रण मिळाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या दोन वर्षांत घरफोडीचे गुन्हे मात्र अपवाद ठरले आहेत. २०१३मध्ये ३१० तर २०१४मध्ये २४८ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिस यंत्रणेला यश आले.

युवती मेळाव्यातून प्रबोधन
-शाळा,महाविद्यालयांत युवती मेळावे घेऊन महिला सुरक्षा महिलांचे कायदे या विषयावर प्रबोधन करण्याचा आराखडा तयार केला जातो. त्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास सुरक्षेची भावना जागृत केली जाते. डॉ.जालिंदरसुपेकर, पोलिस अधीक्षक