आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सात महिन्यांच्या गरोदर महिलेला शुक्रवारी सायंकाळी शाहू रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच प्रसूती झाली. या वेळी रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञ उपस्थित नव्हते. प्रसूतीनंतर नवजात शिशूला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिवाजीनगरातील खडके चाळीत माहेर व पिंप्राळ्यातील सासर असलेल्या सपना नितीन पाटील (वय 19) या सात महिन्यांच्या गरोदर महिलेला शुक्रवारी सायंकाळी प्रसूती वेदना होऊ लागल्या होत्या. तिच्या कुटुंबीयांनी रिक्षातून तिला शाहू रुग्णालयात आणले. रिक्षा रुग्णालयात दाखलकरण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळच संध्याकाळी 7 वाजता तिची प्रसूती झाली. या वेळी रुग्णालयात उपस्थित सोनाली खरे व इतर परिचारिकांनी तेथेच तिची प्रसूती पूर्ण केली. तिला मुलगा झाला असून तो 1100 ग्रॅम वजनाचा आहे. अतिसुरक्षा विभागात त्याला दाखल केले.