आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बोगीत घुसखोरी भोवली; ७८ जणांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - महिलांच्या बोगीत घुसखोरी करणाऱ्या ७८ प्रवाशांवर शुक्रवारी रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली. या सर्व प्रवाशांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रत्येकाकडून १०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा बलाने प्रत्येक गाडीची कसून तपासणी सुरू केली आहे. नियमांची पायमल्ली करून महिलांसाठी राखीव असलेल्या बोगीत दमदाटी करून जागा बळकावण्याचे प्रमाणही गेल्या काही महिन्यांपासून वाढल्याची ओरड होती. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा बलाने शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता भुसावळ स्थानकावर गाेवा एक्स्प्रेसची (गाडी क्रमांक २७८०) तपासणी केली. त्यात महिलांच्या बोगीत ७८ पुरुष आढळले. निरीक्षक व्ही.के. लांजीवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील उपनिरीक्षक आर.सी. सूर्यवंशी, सहायक फौजदार जे.एल. शहा, आकाश वाकोडे, समाधान वाहुलकर, जयश्री पाटील, आय.के. मिर्झा यांनी या प्रवाशांना ताब्यात घेऊन कारवाई केली.

गाड्यांची नियमित तपासणी
प्रत्येकगाडीची कसून तपासणी होत आहे. महिला बोगीत पुरुषांची घुसखोरी होत असेल तर कारवाई करण्यावर भर दिला जा आहे, असे रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक फौजदार अशोक वाकोडे यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे स्थानकातील प्रत्येक प्रवाशावर नजर ठेवली जात आहे. दोन्ही प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेल्या लगेज स्कॅनरवर सामानाची तपासणी होत आहे. आउटरवरही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानकावर धावत्या गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे.


बातम्या आणखी आहेत...