आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका रुग्णालयात महिला डॉक्टरांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महिलांचे हक्क व कल्याण समितीने मंगळवारी सकाळी 10 वाजता अजिंठा विश्रामगृहात पालिकेतील नगरसेविकांशी चर्चा केली. या वेळी समितीने नगरसेविकांना काय अपेक्षित आहे, याची माहिती जाणून घेतली. नगरसेविकांनी मनपा रुग्णालयातील महिला डॉक्टरांची रिक्त पदे असून ती त्वरित भरण्यात यावी, प्रसूतीच्या वेळी औषधींचा साठा उपलब्ध करून द्यावा, यासह विविध प्रश्नांवर चर्चा केली.

बैठकीला महापौर राखी सोनवणे, महिला व बालकल्याण विभाग सभापती ज्योती इंगळे, सिंधू कोल्हे, वर्षा खडके, अँड. सुचिता हाडा, अश्विनी देशमुख, उज्ज्वला बेंडाळे, दीपाली पाटील, शोभा बारी, मंगला बाविस्कर उपस्थित होत्या.
या विषयांवर झाली चर्चा
महिला बालकल्याण विभागाचा 5 टक्के राखीव निधी वापरात यावा, महिलांसाठी शौचालय बांधण्यात यावे. अंगणवाडी इमारतींसाठी जागा पालिकेने उपलब्ध करून द्यावी, बचत गटाचा कारभार हा पारदर्शकपणे चालावा, मनपा शाळापर्यंत केंद्र शासनाच्या योजना पोहोचत नाही, इच्छुक सेवाभावी संस्थांना शाळा चालवण्यास द्याव्या, बसस्थानकावर ग्रामीण महिलांसाठी वेगळा कक्ष स्थापन करावा, बालकांना पोषक आहाराची योजना निधीअभावी बंद पडली असून ती सुरू करण्यात यावी या विषयांवर चर्चा झाली.