आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधमाच्या कचाट्यातून महिलेने केली सुटका, तक्रार करायला गेल्यास पोलिसांनी हकलून लावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला रविवारी सायंकाळी वॉर्डबॉय डॉक्टरांनी बोलावल्याचे सांगून घेऊन जात होता. मात्र, तो निर्जन ठिकाणी घेऊन जात असल्याचे लक्षात आल्याने संबंधित महिलेने मोठ्या धाडसाने हाताला झटका देऊन नराधम वॉर्डबॉयच्या कचाट्यातून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर पीडित महिला तक्रार देण्यासाठी सिव्हिलमधील पोलिस चौकीत गेली पण तेथील पोलिसांनी तिला हाकलून लावले. त्यामुळे तिने साहस दाखवत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

बोदवड येथील ३८ वर्षीय विवाहिता शुक्रवारी गर्भपिशवीला असलेल्या गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी सिव्हिलमध्ये दाखल झाली आहे. रवविारी सायंकाळी ५.४५ वाजता सिव्हिलचा वॉर्डबॉय तिला भेटला. या वेळी त्याने तुम्हाला डॉक्टरांनी बोलावल्याचे सांगून तो त्या महिलेला वॉर्ड क्रमांक १२मधून जुन्या वॉर्ड क्रमांक ६कडे अगदी निर्जन असलेल्या ठिकाणी घेऊन गेला. मात्र, या वेळी त्या महिलेला वॉर्डबॉय चुकीच्या ठिकाणी घेऊन जात असल्याची शंका आली. तिने त्याला डॉक्टर कुठे आहेत? असे विचारले असता, त्याने हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने धाडस दाखवत हाताला झटका दिला आणि पळत जाऊन वॉर्ड क्रमांक १२मध्ये पोहोचली. त्यानंतर तिचा भाऊ आला.
सिव्हिलच्या पोलिसांनी हाकलले
पीडति महिला तिची व्यथा मांडण्यासाठी सवि्हिलच्या पोलिस चौकीत गेली. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांनी येथे तक्रार घेतली जात नाही, असे सांगून तिला आणि तिच्या भावाला हाकलून लावले. पीडति महिलेला चालता येत नसतानाही सायंकाळी ७.१५ वाजता जिल्हापेठ ठाण्यात गोकूळ प्रकाश चौधरी (शिंदगड रा.रावेर) या वॉर्डबॉयविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान गोकूळ चौधरी याने जानेवारी महनि्यातही असाच प्रकार केला होता. मात्र, त्या वेळी संबंधित महिला तक्रार देण्यासाठी पुढे आली नव्हती.

वॉर्डबॉयला शिक्षा व्हावी
डॉक्टरांनी बोलावल्याचे सांगितल्याने मी त्याच्यासोबत गेले. त्या वेळी भाऊ बाहेर गेलेला होता. तो वॉर्डबॉय मला निर्जन ठिकाणी घेऊन गेला. मात्र, मी धाडस दाखवल्याने त्याच्या तावडीतून सुटले. त्याला कडक शिक्षा व्हावी, हीच अपेक्षा आहे.
- पीडित महिला

कारवाई करण्यात येईल
जिल्हा रुग्णालयात घडलेला प्रकार घृणास्पद आहे. त्याची चौकशी करून संबंधति कर्मचारी दाेषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक