आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक झालेली सिलिगुडीची महिला कुटुंबीयांच्या हवाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सिलिगुडीची (पश्चिम बंगाल) एका 27 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून काही अनोळखी तरुणांनी फसवल्याचा प्रकार 17 मार्च रोजी भुसावळ रेल्वेस्थानकावर लक्षात आला होता. त्यानंतर तिला रेल्वे पोलिसांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहात पाठविले होते. गुरुवारी पश्चिम बंगालमधील पोलिस व तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात तिला देण्यात आले. आपल्या गावासाठी ती परतीच्या प्रवासाला निघाली. भुसावळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने तिच्या कुटुंबीयांचा तपास लागला. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.एस. पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल दुर्गा पचुरे यांनी आशादीप वसतिगृहात तिची रवानगी केली होती.
शहर पोलिसांची सतर्कता
आशादीप वसतिगृहात परराज्यातील पोलिस आल्याचे समजताच शहरातील दोन पोलिस कॉन्स्टेबल चौकशीला तत्काळ दाखल झाले. त्यांनीकोठून आलात, परवानगी घेतली का, प्रकरण काय आहे? असे प्रश्न विचारत पोलिस खरे आहेत, याची खात्री पटल्यावर त्यांनी कारवाई पुढे नेण्यास हरकत नसल्याचे सांगितले.
मोबाइलवरून तरुणाशी ओळख
मोबाइलवर असीम नामक मुलाचा एकदा फोन आला. माझे लग्न झाले होते पण माझी बायको मेली आहे. असे सांगत सहानुभूती मिळवली. अशातच दोघांची मैत्री झाली. मुंबईला जाऊन लग्न करू, अशी आश्वासने त्याने दिली. भूलथापांना बळी पडून त्याच्या सोबत जाण्यास ती तयार झाली.
लक्षात येताच काढला पळ
हावडा सोडल्यावर अनोळखी शहरात पोहोचल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्याच्यासोबत आणखी सात जण होते. प्रवासादरम्यान गाव लक्षात येऊ नये म्हणून त्याने चार गाड्या बदलल्या. 17 मार्च रोजी हावडा-मुंबई हॉलिडे एक्स्प्रेसमध्ये सर्व प्रवासी झोपलेले असताना मी भुसावळ रेल्वेस्थानकावर उतरली. माझ्या मागे मित्रासह ते सात जणही आले. पोलिस दिसताच त्यांच्याशी संपर्क साधला. तितक्यात त्या सर्वांनी पळ काढला, असे संध्या सरकार हिने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
औषधीच्या बहाण्याने घरातून निघाली होती
कुनियापुकूर (ता. सिलिगुडी, जि. दार्जिलिंग) येथील संध्या सरकार ही 13 मार्च रोजी औषध घेण्यासाठी घरातून निघाली. साडीला पिकोफॉल करून आणते, असे म्हणत तीन-चार साड्याही सोबत नेल्या. तिला 10 व 7 वर्षीय दोन मुले आहेत. लग्नानंतर तिचा नवरा तिला सोडून एका मुलीसोबत पळून गेला आहे. त्यामुळे तिला मानसिक धक्का बसला आहे. तिच्या सासर्‍याने 15 मार्च रोजी खोडीबारी पोलिस ठाण्यात याबाबत हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.