आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वसतिगृह रेक्टरला निलंबित करण्याचा घाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिक्षक भवनात विद्यार्थिनीवर अत्याचार त्यानंतर कर्मचाऱ्याने केलेली आत्महत्या या दोन घटनांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ढवळून निघाले असताना विद्यापीठ प्रशासन झाकपाक करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिक्षक भवनातील अत्याचार प्रकरणी आता मुलींच्या वसतीगृहाच्या अधिक्षिकेलाच निलंबित करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. शनिवारी व्यवस्थापन परिषदेची वादळी बैठक झाली.या बैठकीत अधिक्षिकेला निलंबित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत परिषदेच्या पुढील बैठकीत निर्णय होणार आहे.
विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणात शुक्रवारी शिक्षक भवनातील कर्मचारी सीताराम पवार याने विद्यापीठातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर या प्रकरणाचे गूढ वाढले.अत्याचार करणाऱ्या पॅलेस्टाईनच्या तरुणास शिक्षक भवनातील खोली देण्यासाठी एका अधिका-याने फोन केला होता असे सांगितले जाते.त्या फोन करणा-या अधिका-याऐवजी आता मुलींच्या वसतिगृहाच्या अधिक्षिकेला निलंबित करण्याबाबत चर्चा झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासन वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याचे दिसून येत आहे. पवार मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीचे वाचनही शनिवारी व्यवस्थापन समितीच्या बैठकीत करण्यात आले. या घटनेमुळे विद्यापीठाची बदनामी होत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी रविवारी मिडीयासमोर विद्यापीठाची बाजू मांडण्यात येणार आहे.
चिठ्ठीचे गौडबंगाल
पवारनेचिठ्ठीत आपण दोषी नाही, असे लिहिल्याचे यापूर्वी कळले आहे. मात्र, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर झालेल्या चिठ्ठीत पवारने आपण दोषी असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे मूळ चिठ्ठी बदलण्यात तर अाली नाही ना? याबाबत संशय बळावला आहे.
राज्यपालांचा भेटण्यास नकार
विद्यापीठाचेकुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम हे सोमवारी राज्यपालांना भेटणार होते. मात्र, शनिवारी दुपारी राज्यपालांनी त्यांना भेट नाकारली असल्याचा फॅक्स राज्यपाल कार्यालयातून आला. विद्यापीठातील गैरप्रकारांसंदर्भात वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांची कात्रणे अभाविपने शुक्रवारी राज्यपालांना फॅक्स करून पाठवली आहेत.
तपास एलसीबीकडे : शनिवारीपोलिस अधीक्षक डॉ.जे.डी.सुपेकर यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. तत्पूर्वी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.कुणाल पवार यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन तपास एलसीबीकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटी आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियातर्फे कुलगुरू तथा विद्यापीठाच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले अाहे. कुलगुरूंनी विद्यापीठात अनेक नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
चिठ्ठी झाली उघड
शुक्रवारीपवारने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सील करण्यात आली होती. शनिवारी दुपारी ३.३० वाजता पाळधी आऊटपोस्टचे पाेलिस उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांच्यासह पवारचे नातेवाईक विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर सील उघडून चिठ्ठी वाचण्यात आली. पवारने त्याचा मुलाच्या फी भरण्याच्या चलनाचा चिठ्ठी लिहिण्यासाठी वापर केला आहे. त्यात त्याने ‘माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. मी योगायोगाने त्यात अडकलो आहे. त्यात आता माझी बदनामी होणार, या भीतीने मी आत्महत्या करीत आहे’ असे लिहिले आहे. त्याखाली ‘पवार एस.’ असे लिहून दोन सह्याही केल्या आहेत.