आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी करायचा महिलांशी जवळीक, मग हत्‍या, नंतर हडपायचा जमीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नातेवाईक महिलांशी जवळीक करून त्यानंतर त्यांचा खून करून जागा हडप करणाऱ्या पळासखेडे (ता.जामनेर) येथील अाराेपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी वाजता ताब्यात घेतले अाहे. जळगावसह अाैरंगाबाद पाेलिसांनाही ताे अनेक दिवसांपासून हुलकावणी देत हाेता. त्याच्यावर जामनेर पाेलिस ठाण्यातही गुन्हे दाखल अाहेत.
पळासखेडे येथील सुपडू ऊर्फ मधुकर राजाराम तायडे (पाटील, वय ६१) याच्यावर जामनेर पाेलिस ठाण्यात सात अाणि अाैरंगाबाद िजल्ह्यातील साेयगाव पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल अाहे. त्याने त्याचा मुलगा राजेंद्र तायडे, सालदार सुकलाल बारेला यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये जारगाव (ता.पाचाेरा) येथील सखुबाई पाटील यांचे पाराेळा येथून महिंद्रा बाेलेराे या गाडीतून अपहरण केले हाेते. त्यानंतर त्या ितघांनी मिळून सखुबाई यांचा खून करून शेंदुर्णी-साेयगाव रस्त्यावरील जंगलात मृतदेह फेकून दिला हाेता. अडीच महिन्यांनंतर म्हणजे नाेव्हेंबर २०१४ मध्ये साेयगाव पाेलिस ठाण्याच्या हद्दीत एक सडलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला हाेता. साडीवरून जारगावच्या कैलास पाटील याने मृतदेह त्याची अाई सखुबाई यांचा असल्याचे अाेळखले हाेते. त्या वेळी साेयगाव पाेलिसांनी राजेंद्र सुकलाल यांना अटक केली हाेती. सध्या दाेन्ही न्यायालयीन काेठडीत अाहेत. मात्र, सुपडू तेव्हापासून फरार हाेता. सुपडूचे पाचाेऱ्यात जेसीबीच्या स्पेअर पार्ट््सचे दुकान अाहे. त्याच्या माध्यमातून त्याची सखुबाई यांच्याशी अाेळख झाली हाेती. सुपडू सखुबाई यांचे जमिनीवरून वादही झाले हाेते.

सुपडूने लुबाडल्या अनेकांच्या जमिनी
खुनाचाअाराेपी असलेल्या सुपडू तायडे याच्याकडे पळासखेडे येथे ९० एकर बागायती जमीन अाहे. अाैरंगाबाद िजल्ह्यातील गारखेडा येथे माेठा फार्म हाऊस अाहे. तसेच पळासखेडे येथे माेठा बंगला अाहे. दरवाजासमाेर तीन, चार चारचाकी गाड्या अाहेत. त्याने अनेकांची जमीन लुबाडली असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

खुनाची कबुली
सुपडूतायडे हा पळासखेडे येथे येणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळाली हाेती. त्यांनी सहायक िनरीक्षक दीपक लगड, नुराेद्दीन शेख, भास्कर पाटील, प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने सुपडू याला पळासखेडे येथून ताब्यात घेतले. दाेन खून केल्याची त्याने कबुली दिली अाहे.

अनेक गुन्हे दाखल
सुपडूवरजामनेर ठाण्यात १९९१ मध्ये दराेड्याचा, १९९३ मध्ये चाेरीचा, १९९४ मध्ये जबरी चाेरीचा, विनयभंगाचा, २००३ मध्ये अपहरण, फसवणुकीचा, २००४ मध्ये मारहाणीचा, २००५ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल अाहे. तसेच साेयगाव पाेलिस ठाण्यात २०१४ मध्येही खुनाचा गुन्हा दाखल अाहे.