आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक उत्सवात महिला सहभाग वाढल्याचे सुखद चित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सार्वजनिक उत्सवांत महिला-युवतींचा सहभाग वाढल्याचे सुखचित्र आहे. ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वेशभूषेत लेझीम, दांडपट्टा, लाठी-काठी चालवण्याच्या चित्तथरारक कसरती दाखवण्यातील महिलांचा हातखंडा कौतुकास्पद आहे.

गुढीपाडव्याला हिंदू नववर्षानिमित्तच्या जनजागृती रॅलीत पारंपरिक वेशभूषेत महिला-युवती सहभागी होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात महिला-युवतींचा उत्साही सहभाग होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी (दि.५) निघालेल्या मिरवणुकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. चैत्रा पुणे नाका येथील गणेशोत्सव मंडळात फेटा बांधलेल्या महिलांचे मंडळाने लेझीमचे कसब दाखवले. वर्धमाननगरातील महिलाही पारंपरिक नऊवारी साडी अन्् नथ घालून लेझीम खेळता सहभागी झाल्या. नऊवारी साडी नेसलेल्या महिला अन् लेझीम पथक हे यंदाच्या उत्सावातील वैशिष्ट्य. सोमवारी सकाळी होम मैदान, विजापूर रस्ता, पुंजाल मैदान येथील गणेशमूर्ती विक्री सेंटरवर महिला-युवतींची संख्या मोठी होती. आम्हाला पितांबर असलेली मूर्ती हवीय, शाडूमातीची मूर्ती आहे का? अशी विचारणा करीत महिला गणेश मूर्ती खरेदी करीत होत्या. काही तरुणी कपाळाला ‘गणपती बाप्पा मोरया’नामघोषाची पट्टी बांधून मोटारसायकलवरून मूर्ती खरेदीसाठी येत होत्या. कसबा आजोबा गणपती मंडळातर्फे गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होते. शिवजयंतीच्या निमित्ताने विविध संघटनांच्या महिला अभिवादनासाठी येतात. पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रमाबरोबरच आता महिला मंडळातर्फे व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य शिबिर, कायदेविषयक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. एकूणच सार्वजनिक उत्सवात महिलांचा सहभाग वाढत असल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक उत्सवात नारीशक्तीचा सहभाग वाढल्याचे सुखचित्र हल्ली दृष्टीस पडते. सोमवारी सुरू झालेल्या गणेशोत्सवातही याची प्रचिती आली. वर्धमान नगरातील महिलांनी अपूर्व उत्साहात पारंपरिक वेशभूषेत नटून, लेझीमवर ताल धरत गणपती बाप्पांचे स्वागत केले. या पथकात २० महिला-मुलींचा समावेश होता. दुसऱ्या छायाचित्रात लोभा मास्तर चाळ येथील सरस्वती तरुण मंडळाने विनावाद्य, डाॅल्बीचा दणदणाट टाळून गणरायाचे भक्तिभावाने स्वागत केले. येथे भगव्या फेटेधारी भगिनींनी लक्ष वेधले. छाया : दत्तराज कांबळे
बातम्या आणखी आहेत...