आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीदिनी महिला ठेवीदारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ठेवीपरत मिळाव्यात या मागणीसाठी लोकशाही दिनाचे औचित्य साधत विविध संघटनांच्या महिला ठेवीदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. २००च्या वर महिला या वेळी उपस्थित होत्या. मात्र, त्यांना पुन्हा आश्वासनच मिळाले. ठेवी परत मिळाल्यास पतसंस्थाचालकांवर कारवाई झाल्यास २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही ठेवीदार संघटनांनी दिला.
पीडित उपवर मुलींची संघटना

जिल्हापतसंस्था ठेवीदार संघटनेच्या अश्विनी डोलारे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही दिनातही न्याय मिळत नसल्याने एकत्रित अर्ज करून बैठक घेतली. यात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यापुढे व्यथा मांडल्या. चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या अवसायकाने कमिशन घेऊन परस्पर १४ लाखांची वाटप कशी केली? या विषयावर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले. या वेळी राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक मंडोरे, संदीपसिंह वर्मा, नथ्थू कोळी, उमाकांत वाणी यांनी दिला. लोकशाही दिनात ठेवीदारांचीच संख्या अधिक होती.
90 तक्रार अर्ज
लोकशाहीदिन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.एकूण ९० अर्ज प्राप्त झाले. त्यात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या ३६ तक्रारी अाल्या, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील १५, मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ २, विशेष भूसंपादन अधिकारी २, वीज वितरण कंपनी १, उपजिल्हाधिकारी २, पोलिस अधीक्षक यासह अनेक तक्रारी अाल्या.
ठेवी परत मिळाल्यास २६ रोजी उपोषणाचा इशारा