आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी रणरागिणींचा पोलिस ठाण्यातच ठिय्या, आठ दिवसांचा अल्टिमेटम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करावे, या मागणीसाठी सुमारे २०० महिलांनी मंगळवारी दुपारी वाजता तालुका पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून निरीक्षकांना घेराव घातला. आठ दिवसांचा अल्टिमेटम देत, या रणरागिणी राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात धडकल्या. मात्र, कुलूप लागलेले कार्यालय पाहून त्यांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्‍या.

कुऱ्हे (पानाचे) येथे दारू विक्रीसह सट्टा, जुगार, गुटख्याची काळ्या बाजारात विक्री वाढली आहे. पोलिसांचे पाठबळ असल्याने अवैध व्यावसायिक मुजोर झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी गावातील सुमारे २०० महिला सुरुवातीला तालुका पोलिस ठाण्यात धडकल्या. जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार आिण त्यांच्या पत्नी साधना पवार, पंचायत समिती सदस्या अलका पारधी सरपंच सुमनबाई पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाईसाठी आंदोलकांनी थेट निरीक्षक राजेंद्र मुरकुटे यांना घेराव घातला. कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर महिला जळगाव रोडवरील राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयाकडे वळल्या.

तिखटशेरेबाजी : राज्यउत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय मंगळवारी दुपारी वाजेपर्यंत बंद होते. कार्यालयास लागलेले कुलूप पाहून महिलांनी अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला. सुमारे तासभर वाट पाहूनही विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयाकडे फिरकले नाहीत. कार्यालयीन वेळेत असलेले कुलूप पाहून महिलांनी "आंधळ दळतेयं अन् कुत्र पीठ खातेयं' अशी शेरेबाजी केली.

-गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना आठवडाभराची मुदत दिली आहे. कारवाई झाल्यास अचानक रास्ता रोको आंदोलन होईल. याची जबाबदारी पोलिसांची असेल. समाधानपवार, सदस्य, जिल्हा परिषद, कुऱ्हे पानाचे
-कुऱ्हे पानाचे येथील दारू विक्रेते, अवैध व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस कारवाई करतील. कोणाचीही हयगय केली जाणार नाही. रोहिदासपवार, डीवायएसपी, भुसावळ

-अवैध धंदे वाढल्याने अनेकांचे संसार उद््ध्वस्त झाल्याचा आरोप करताना महिला आंदोलक गहिवरल्या.
-पोलिसांनी कारवाई केली नाही तर थेट रस्त्यावर उतरू, असा इशाराही उपस्थित महिलांनी दिला.