आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळा तालुक्यात विवाहितेने दोन मुलांसह स्वत:ला पेटवून घेतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा - जळगाव जिल्ह्यातील सावखेडा होळच्या विवाहितेने २ लहान मुलांसह स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यात तिचा जागीच तर मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
सुनील भीमसिंग पाटील याचे लग्न १९९५ मध्ये अनिताशी झाले होते. त्यांना २ मुले व १ मुलगी होती. गुरुवारी सुनील हॉटेलवर कामासाठी तर सासू देवकाबाई पारोळ्याला बँकेत गेल्या होत्या.

सासरे भीमसिंग बकऱ्या चारण्यासाठी शेताकडे व अनिताची ६ वर्षीय मुलगी पूनम शाळेत गेली होती. घरी अनिता, मुलगा लोकेश (५) व पिंटू (१ वर्ष) हेच होते. ११ वाजेच्या सुमारास अनिताने स्वत:च्या व मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यात अनिता १०० टक्के भाजल्याने जागीच ठार झाली. तर, दोन्ही मुले गंभीर भाजल्याने त्यांना ग्रामस्थांनी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
सासरकडून काहीच त्रास नव्हता
सुनील हा हॉटेलच्या कामात व्यस्त असल्याने सुनील हा गेल्या काही महिन्यांपासून घरी येतच नसल्याचे अनिता हिने वडील दगडू त्र्यंबक पाटील यांना सांगितले. तसेच अनिता ही अक्षय्य तृतीयेला माहेरी आली होती. तिच्याकडे मोबाइल नसल्यामुळे त्यानंतर तिच्याशी आमचा संवाद नव्हता. तिच्या संसारात कोणताही वाद नसल्याचे सांगण्यात आले.