आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कांचननगरभागातील रहिवासी राखी उर्फ भुरी सिद्धार्थ ठाकूर (वय २२) या विवाहितेने गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. धुळे तालुक्यातील लळिंग हे राखीचे सासर होते. गेल्या आठवड्यातच ती माहेरी आली होती. कौटंुबिक वाद सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सायंकाळी राखीचे आई-वडील रामेश्वर कॉलनी येथे गेलेले असताना राखीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राखीला एक मुलगा मुलगी आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पष्टाणेच्यामहिलेचा प्रसूतीप्रसंगी मृत्यू
धरणगावतालुक्यातील पष्टाणे येथील रुपाली तुकाराम पाटील या २० वर्षीय विवाहितेचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्त्राव झाल्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ऑगस्ट रोजी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३५ वाजता तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात अाकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.