आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्स चाेरून धावत्या बसमधून उडी घेत पळणाऱ्या 4 महिलांना पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जामनेरते जळगाव बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरी केल्याचे लक्षात येताच चारही चोरट्या महिलांनी चालू बसमधून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिंचोली गावाजवळ शनिवारी सकाळ १०.३० वाजता घडली. मात्र, प्रवाशांनी बस थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेऊन चौघींना पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, चीन हा देश पाकिस्तानच्या मदतीने भारत विरोधी कारवाया करीत आहे. या गोष्टीला प्रत्येक भारतीयांचा राग आहे. त्यामुळे आपण थेट बॉर्डरवर युद्ध करता चिनी मालाची खरेदी-विक्री बंद करून देखील विरोध दर्शवू शकतो, असे मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले. या बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा पदाधिकारी उपस्थित होते.

सुरेखा मुरलीधर डोळे ही महिला शनिवारी सकाळी ९.३० वाजता जामनेरहून जळगावकडे येणाऱ्या एमएच-४०, ९०९५ या बसमध्ये बसली. नेरीजवळ बस थांबल्यानंतर चार महिला तीन लहान मुलांसह गाडीत बसल्या. काहीवेळानंतर त्या चारही महिलांनी सुरेखा डोळे यांच्या सीटजवळ गर्दी केली. त्यानंतर एका महिलेने मुलगा रडत असल्याचे सांगून डोळे यांच्या बाजूला बसली. काहीवेळाने त्या महिलेने मुलाला त्यांच्या बाजूला बसवले. चिंचाेली गावाजवळ लक्ष विचलित करून बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेने डोळे यांच्या बॅगमधून पर्स काढली. मात्र, त्याच वेळी बॅगमधून पर्स काढल्याचे लक्षात अाले. त्यांनी त्या महिलेला विचारले असता पर्स खाली पडल्याचे महिलेने सांगितले. मात्र, त्या पर्स चाेरणाऱ्या महिला असल्याचे प्रवाशांना लक्षात आल्याने त्यांनी बस थेट एमआयडीसी पाेलिस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितली. त्यामुळे चारही संशयित महिलांनी चालू गाडीतून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशांनी त्यांना पकडून ठेवले.

लहानमुलांचा घेतात अाधार
यामहिला चाेरी करताना लहान मुलांचा अाधार घेतात. पाेलिसांनी पकडल्यानंतर त्याच मुलांना पुढे करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात.

^चीनविरोधातदेशात संतापाच लाट आहे. त्यामुळे चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकून विरोध दर्शवला आहे. याचा बाजारपेठेवर परिणाम होईल. ललितबरडिया, सचिव, जिल्हा व्यापारी महामंडळ

यामालावर पडेल अधिक फरक
मोबाइल,लायटिंग, दिवे, फटाके, खेळणी या प्रमुख वस्तुंच्या विक्रीवर मोठा फरक पडेल. त्या पाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हार्डवेअर यांचा समावेश असेल, अशी माहिती व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

तक्रार दिल्यामुळे फक्त प्रतिबंधात्मक कारवाई
चारही महिलांना मे महिन्यात बसमध्ये पर्स चाेरताना प्रवाशांनी एमअायडीसी पाेलिसांच्या ताब्यात दिले हाेते. मात्र, त्या वेळी ज्या महिलेची पर्स चाेरण्याचा प्रयत्न झाला हाेता. तिने तक्रार देण्यास नकार दिल्याने या महिलांना प्रतिबंधात्मक कारवाई करून साेडून दिले हाेते. शनिवारीही संबंधित महिलेने फिर्याद देण्यास नकार दिल्यामुळे पुन्हा पाेलिसांना नाईलाजाने त्या महिलांवर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची वेळ आली.

दोन संशयित महिला जखमी
बसचालकसुनील गणपत देशमुख आणि वाहक सुनीता ईश्वरलाल लोहार यांनी बस थेट एमअायडीसी पाेलिस ठाण्यात नेली. त्यानंतर प्रवाशांनी चारही महिलांना पाेलिसांच्या स्वाधीन केले. पाेलिसांना चाैकशीत त्यांनी श्रीशा गाैतम मसनजाेगी, दीपा गाैतम मसनजाेगी, सुनीता सिद्धू मसनजाेगी, अर्चना अरविंद मसनजाेगी (सर्व रा. चिखली, जि. बुलडाणा) असे नाव सांगितले. मात्र, त्यांच्याकडे अाेळखपत्र नव्हते. वस्तू विक्रीसाठी जात असल्याचे त्या सांगत हाेत्या. तर बसमधून उडी मारताना श्रीशा, सुनीता या जखमी झाल्या.
प्रवाशांनी पकडून दिलेल्या संशयित चारही महिला.

आर्थिक गुन्ह्यांमध्ये फिर्यादीची गरज
^आर्थिकगुन्ह्यांमध्ये फिर्यादीची गरज असते. त्या गुन्ह्यात पाेलिस फिर्यादी हाेऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. - सुनीलकुराडे, पाेलिस निरीक्षक, एमआयडीसी
बातम्या आणखी आहेत...