आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: दारुड्यांचा गाेंधळ थांबल्यास महिला ‘अपना वाइन’समाेर अांदाेलन छेडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश कॉलनीतील वाइन शॉपसमोर लागलेली रांग. - Divya Marathi
गणेश कॉलनीतील वाइन शॉपसमोर लागलेली रांग.
जळगाव- शहरातील ४५ दारू दुकाने बंद झाल्यानंतर गणेश काॅलनी चाैकातील दारू दुकानासमाेर रस्त्यावरच दारुड्यांचा धुमाकूळ सुरू झाला अाहे. दुकानमालकाने रस्त्यावरच ‘बार’ उघडल्यामुळे महिलांना जणू या रस्त्यावर अघाेषित बंदी झाली अाहे. वाढत्या त्रासामुळे डाेक्यावरून पाणी गेल्याची भावना व्यक्त करत महिलांनी थेट ‘अपना वाइन’ या दुकानासमाेरच अांदाेलनाची तयारी सुरू केली अाहे. महामार्गापासून दुकानाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची माेजणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येईल. 
 
सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानंतर महामार्ग राज्य मार्गापासून ५०० मीटर अंतरावरील सर्व दारू दुकाने परमिट रूम-बिअर बार बंद करण्यात अाले अाहेत. या निर्णयामुळे शहरातील केवळ गणेश काॅलनी रामानंदनगरातील दारू दुकाने सुरू असून, त्या ठिकाणी दिवसभर प्रचंड गर्दी हाेत अाहे. गणेश काॅलनीतील ‘अपना वाइन’ या दुकानासमाेर दिवसा सायंकाळी उशिरापर्यंत दारू पिणाऱ्यांची प्रचंड गर्दी हाेत अाहे. रस्त्यावरच दारू पिण्याचा प्रकार सर्रास घडत असल्याने या परिसरातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत अाहे. वाढत्या त्रासामुळे साेमवारी रात्री वाजता गणेश काॅलनी, श्रीनिवास काॅलनी, नवप्रभात काॅलनी, उदय काॅलनी, गंधर्व काॅलनी, चैतन्यनगर प्राेफेसर काॅलनीतील सुमारे ७० ते ८० महिला पुरुषांनी तातडीची बैठक बाेलावली हाेती. या वेळी उद््भवलेल्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महिलांनी तीव्र शब्दांत अापल्या भावना व्यक्त केल्या. 
 
दुकानासमाेर ठिय्या अांदाेलन 
गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या दारू दुकानाबाबत काेणतीही तक्रार नाही; परंतु रस्त्यावर सुरू असलेल्या वाईट प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे भावना व्यक्त करण्यात येणार अाहेत. त्यानंतरही प्रशासनाने कारवाई केल्यास थेट कायदा हातात घेऊन दारू दुकानासमाेर महिला ठिय्या अांदाेलन करून अाक्रमक भूमिका घेणार असल्याचे महिलांनी सांगितले. 
 
रुग्णांची संख्या राेडावली 
बैठकीला उपस्थित असलेले डाॅ. संजय चाैधरी डाॅ. सचिन फिरके यांनी दारू दुकानासमाेर वाढलेल्या गाेंधळामुळे सायंकाळी सर्वसामान्य नागरिक तसेच रुग्ण उपचारासाठी येणे टाळत अाहेत. त्यामुळे दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्याही राेडावली अाहे. भरदुपारी नागरिकांना दवाखान्यात यावे लागत असून, सायंकाळी परिवारासाेबत या रस्त्याने फिरणे टाळत असल्याचे सांगितले. याच परिसरातील सखी ब्यूटीपार्लर श्रीनिवास क्लासेस स्थलांतरितची वेळ अाल्याचे सांगण्यात अाले. 
 
समस्यांनी नागरिक त्रस्त 
शहरातील अस्वच्छता, दुर्गंधी, वाहतुकीचा खाेळंबा, उघड्यावर सुरू झालेला दारू अड्डा यासह अनेक समस्यांना नागरिकांना ताेंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महामार्गापासून दारू दुकानापर्यंत येणाऱ्या सर्व रस्त्यांचे अंतर माेजण्याची मागणी नागररिकांंकडून करण्यात आली आहे. 
 
नगरसेविकांची बैठकीकडे पाठ 
या परिसरातील नगरसेविकांना बैठकीसाठी बाेलावण्यात अाले हाेते. लाेकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अांदाेलनाची दिशा ठरवली जाणार हाेती; परंतु दाेन्ही नगरसेविकांनी बैठकीकडे पाठ फिरवली. या वेळी नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांना बाेलावण्यात अाल्याने त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. 
 
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार 
येत्या अाठवड्यात जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांची गणेश काॅलनी परिसरातील नागरिक भेट घेणार अाहेत. रस्त्यावर दारुड्यांचा तमाशा सुरू असून, सर्वसामान्यांना या मार्गाने जाताना येणाऱ्या अडचणी मांडणार अाहेत. दारू पिणारे त्याच ठिकाणी बाटल्या पाण्याचे पाऊच टाकतात. तसेच वाहने रस्त्यातच लावत असल्याने परिसरातील नागरिकांना जागा मिळत नाही. अनेकदा दारूच्या नशेत अर्वाच्य भाषेचा वापर केला जाताे. शिवीगाळ हाणामारी ही नित्याची झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे अाहे. यामुळे शांतता भंग पावली असून, सायंकाळी महिलांना घराबाहेर पडण्यावर जणू निर्बंध घातल्याची भावना अाहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा महिलांच्या प्रतिक्रया... 
बातम्या आणखी आहेत...