आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याकडे महिलांचा वाढता कल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - धावपळीचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी बाजारात दररोज नवीन ब्रॅण्डेड भांड्यांची उत्पादने येत असतात. घरगुती उपयोगी आणि माफक किमतीमुळे सेलमध्ये या वस्तू खरेदी करण्याकडे महिलांचा कल दिसून येत आहे.
पूर्वी महिला घरगुती वापराच्या वस्तूंची जास्त खरेदी करत असत. घरी पाहुण्यांची गर्दी वाढली तर तारांबळ होऊ नये यासाठी जास्तीच्या वस्तू खरेदीकडे कल दिसून येत होता; मात्र आता महिलांची जीवनशैली ज्याप्रमाणे बदलत आहे, त्याचप्रमाणे त्यांचे राहणीमान व विचारसरणीही बदलत आहे. त्यामुळे ब्रॅण्डेड वस्तू खरेदीवर त्यांचा भर दिसून येत आहे. महिलांवर टीव्हीचा खूप प्रभाव पडला असून, त्यावर दाखविलेले सगळ्या सुख-सोयींनी भरलेले किचन त्यांना हवे असते. त्यामुळे स्वयंपाकघरात अत्याधुनिक वस्तू तर घरात ब्रॅण्डेड भांडी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढत आहे. तसेच घरातील अनेक वस्तू फक्त हौसेपोटी घेतलेल्या असतात. अत्याधुनिक आहे म्हणून ती वस्तू घ्यावी, असा महिलांचा सूर असतो. वेळ कमी लागणारे आणि काम सोपे करणारे यंत्र त्यांना हवे असते. असे असले तरी अनेकदा या वस्तू थोडेच दिवस वापरण्यात येऊन लगेच
अडगळीत पडतात.
वर्षाला होतो किमान 50 हजारांचा खर्च
सणवार किंवा काही खास दिवस असल्यास महिलांचा घरगुती वस्तू खरेदीवर भर असतो. त्यादृष्टीने त्यांची तयारीदेखील झालेली असते. आता अनेक वस्तू हप्त्याने मिळत असल्याने प्रथम मोठी आणि नवीन टेक्नॉलॉजीची वस्तू घेणे त्या पसंत करतात. महिला दरवर्षी 50 हजारांच्या वस्तू खरेदी करीत असल्याचे दिसून येते.
सेलला गृहिणींकडून पसंती
शहरात अधूनमधून संसारोपयोगी साहित्याचे सेल लागतात. या सेलमध्ये नानाविध ब्रॅण्डेडची भांडी व इतर साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे सेलमधून खरेदी करणा-या महिलांची संख्या मोठी आहे.

दिवसेंदिवस नवनवीन वस्तू घेण्याकडे महिलांचा कल वाढत असून, एकदा विचारून जातात व दुस-यांदा त्यांच्या बजेटप्रमाणे वस्तू घेऊन जातात. महाग असली तरी चालते; मात्र ती ब्रॅण्डेड हवी, असे त्यांचे म्हणणे असते. सध्या फूड प्रोसेसर, ज्यूसर व प्रेशर कूकरला मागणी आहे. आठवड्यातून दोन-तीन आरामात विक्री होतात.
रमेश बजाज, बजाज ट्रेडर्स

या वस्तूंना आहे मोठी मागणी
सध्या मायक्रोव्हेव, ओव्हन, डबल डोअर फ्रीज, मिक्सर, फूड प्रोसेसर, स्टीम कूकर, चिमणी, ज्यूसर इत्यादी वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.