आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक अडचणी सांगून जबाबदारी टाळू नका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महिलांनी प्रशासकीय सेवेत काम करताना कुटुंबाच्या अडचणी पुढे करून स्वत:च्या जबाबदार्‍या झटकू नये. कुठलेही काम करताना अडचणींवर मात करावी, असा सूर ‘नोकरी करणार्‍या महिलांच्या प्रशासकीय व कौटुंबिक जबाबदार्‍या व कर्तव्ये ’या विषयावरील चर्चासत्रातून उमटला.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सेवेत काम करणार्‍या कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा छत्रपती शाहू महाराज सभागृहात शुक्रवारी दुपारी पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एन.अंबिका, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कुटे, कर्मचारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्षा प्रतिभा सुर्वे व मंगेश बाविस्कर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी अंध, मूकबधिर अथवा इतर आजारांवर मात करून जिल्हा परिषदेत आपली जबाबदारी यशस्वी सांभाळणार्‍या पाच महिलांचा या वेळी गौरव करण्यात आला. त्यानंतर जबाबदार्‍या आणि कर्तव्यावर प्रश्‍नोत्तराच्या स्वरुपात चर्चा झाली. प्रतिभा सुर्वे यांनी प्रास्तविक केले.