आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women's Death Of Wanting Treatment Issue At Jalgaon

गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल सरला विठोबा पाटील (वय 26) रा. माळपिंप्री ता. जामनेर या महिलेचा शनिवारी सायंकाळी उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या हातून उपचार न झाल्यामुळे या महिलेने मरण यातना सहन केल्या. या विभागात पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर नाही.


माहेजी हे सरलाचे सासर होते. गरोदर असल्यामुळे ती जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथे म्हणजेच आपल्या माहेरी आली होती. प्रसूतीसाठी माळपिंप्री येथूनच ती शुक्रवारी सामान्य रुग्णालयात दाखल झाली. शुक्रवारी रात्री 8.20 मिनिटांनी तिचे एकदा सीझर होऊन तिने एका मुलीला जन्म दिला होता. शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत तिची प्रकृती ठीक होती. त्यामुळे तिला पोस्ट नेटल सेंटर (प्रसूतीनंतरच्या काळजी कक्ष) येथे ठेवण्यात आले होते. चार वाजेनंतर अचानक सरलाला यातना होऊ लागल्या. तिने वॉर्डमध्ये असलेल्या परिचारिकांना आपल्या वेदना सांगितल्या; मात्र शिकाऊ परिचारिकांना योग्य निदान सापडले नाही.

मरणयातनेनंतर डॉक्टरांना फोन
सायंकाळी साडेपाच नंतर सरला अक्षरश: यातना सहन करत होती. तिची ही अवस्था पाहून घाबरलेल्या पारिचारिकांनी 5.55 वाजता डॉ. नीता भोळे यांना फोन करून माहिती दिली. 6.05 मिनिटांनी डॉ. भोळे वॉर्डात पोहोचल्या. त्या महिलेला श्वासोच्छ्वास घेता येत नव्हता. त्यामुळे सरलाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तिच्यावर डॉ. रमाकांत पाटील हे उपचार करीत होते. तथापि, सायंकाळी सरलाचा श्वासोच्छ्वास पूर्णपणे थांबला. तिचे नातेवाईक चार वाजता पाहून गेले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला आहे, असा आरोप संतोष काशिराम गायकवाड, किशोर विठ्ठल पाटील यांनी केला.

10 मिनिटे केले उपचार
संबंधित महिलेला त्रास होत असल्याचा फोन 5.55 वाजता आला होता. त्यानंतर मी वरच्या मजल्यावरील पोस्ट नेटल सेंटरमध्ये 6.05 वाजता पोहोचले. डॉ.रमाकांत पाटील आणि मी या महिलेवर 10 मिनिटे उपचार केला. याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉ. नीता भोळे, प्रसूती विभागप्रमुख