आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांच्या उत्थानासाठी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - केंद्र शासनाने तळागाळातील महिलांच्या उत्थानासाठी सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेच्या जागी आता राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नव्याने सुरू केले आहे. राज्यातील 53 शहरांत जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर चार शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या नागरी क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जनगणनेच्या आकडेवारीनुसार 28 टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. यात वाढ होत असून प्रमुख कारण म्हणजे स्थलांतर आहे.

दुर्बल घटकांचा स्तर उंचावण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. 74व्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षण, आरोग्य तसेच नागरी क्षेत्रातील दारिद्र्य निवारण करणे, हे स्थानिक संस्थांचे बंधनकारक कर्तव्य आहे. केंद्र शासनाद्वारे राज्यांच्या मदतीने नेहरू रोजगार योजना (एन.आर.वाय.), नागरी गरिबांसाठी मूलभूत सेवा योजना (यू.बी.एस.पी.) दारिद्र्र्य निवारण कार्यक्रम (पी.एम.आय.यू.पी.ई.पी.) या योजना राबवल्या जातात.

योजनेत बदल
दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देणे, रोजगार, स्वयंरोजगार देणे, बचत गटांच्या माध्यमातून संघटित करून व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना सुरू करण्यात आली होती. 12व्या वार्षिक अभ्यासगटाने केलेल्या शिफारशीनुसार या योजनेच्या जागी आता राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सुरू केले आहे.
...असे आहे नियोजन
सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेच्या आधार महानगरपालिका, पालिकातील दारिद्र्र्य कक्षाचे रूपांतर शहरी अभियान कक्षात करणे, या योजनेतील कार्यरत प्रकल्प संचालक, अधिकारी व समूह संघटकांना अभियानांतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी व समूह संघटकांना सामावून घेणे, आधार केंद्राचे रूपांतर करणे, या योजनेतील स्थापित महिला स्वयंसाहाय्य समूहांचा आढावा घेऊन उर्वरित महिलांना सामावून घेणे, स्थानिक स्तरावर महिला स्वयंसहाय समूहांची स्थापना व क्षमता वृद्धीसाठी शोध संघटन तयार करणे आदी बाबींची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
निर्धारित लक्ष्य
सन 2011च्या जनगणनेनुसार एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 44 शहरे, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली परंतु जिल्हा, मुख्यालय असलेली 09 शहरे अशा राज्यातील 53 शहरांचा यात समावेश आहे. समुदाय- शहरी गरीब, शहरी बेघर कुटुंब सामाजिक आर्थिक जनगणनेनुसार निश्चित करण्यात आलेली व निश्चित होईपर्यंत बी.पी.एल.कुटुंबे.घटक सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी क्षमता बांधणी व प्रशिक्षण कौशल्य प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराची उपलब्धता स्वयंरोजगार कार्यक्रम
फेरीवाल्यांना सहायशहरी बेघरांना निवारा अभियानाचे व्यवस्थापन आदी घटक राबवण्यात येणार आहेत.