आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळातील मारवाडी महिला मंडळ उभारणार लघुउद्योग प्रकल्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सामाजिक उपक्रम राबवण्यात अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ अग्रस्थानी असते. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी म्हणून मंडळातर्फे लवकरच लघुउद्योग प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.
अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या भुसावळ शाखेच्या माध्यमातून २००७ पासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य तपासणी, महिलांसाठी लघुउद्योग मेळावे, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा प्रकारच्या उपक्रमांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील ४४ विद्यार्थ्यांना मंडळाने तीन लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. तर गेल्या वर्षी यावल तालुक्यातील कासवे, कठाेरे अशा जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक, पंखे, वॉटर फिल्टरसह अन्य शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले होते. बालदिनी मंडळाने शहरातील पालिका शाळा क्रं.३१ आणि मधील १०० विद्यार्थ्यांना स्वेटर दिले. यासह महिला मंडळाने अनेक उपक्रम राबवले आहेत. उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी भुसाळात महिलांसाठी लघु उद्योग प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पापड, लोणची, मसाले या पदार्थांची निर्मिती केली जाणार आहे. यातून महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळेल. तसेच ग्रामीण भागातील महिलांचे स्वावलंबन या माध्यमातून घडून येणार आहे. यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती राठी, जयश्री भराडिया, राजेश्री कालायती, वर्षा जैन, हेमा बेहरा, संगीता अग्रवाल, विना जैन, कामिनी जैन, लिना जैन, शांता टाक, सोना काबरा आदी सदस्या परिश्रम घेत आहेत.

ख्रिसमच्या काळात मेळावा
^महिलांनारोजगाराचीसंधी उपलब्ध करून देण्यासाठी ख्रिसमसच्या कालावधीत लघुउद्योग मेळावा आयोजित केला जाणार अाहे. तसेच महिलांना व्यापक स्वरूपात रोजगाराची संधी देण्यासाठी लघुउद्योग प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. भारतीराठी, अध्यक्षा, मारवाडी महिला मंडळ, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...