आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात महिलांची अांतरराष्ट्रीय परिषद, रविवारपासून गांधीतीर्थवर तीन दिवस कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - येथील जैन हिल्सवरील गांधीतीर्थ येथे ते ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट, भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्यूट ऑफ नॉनव्हायलन्स अॅण्ड पीस, मदुराई यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद हाेईल. ३५ देशांतील २०० महिला प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

रविवारी सकाळी १०.३० वाजता जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर कृष्णमल जगन्नाथन यांच्या हस्ते परिषदेचे उद‌्घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या जिलकार हॅरिस, विश्वस्त दलीचंद जैन, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित राहतील. या तीन दिवसीय परिषदेत विविध विषयांवरची चर्चासत्रे, एकमेकांच्या अनुभवांचे आदान-प्रदान हाेणार अाहे. गांधी विचारांना अंगीकारून कार्य करणाऱ्या जगभरातील निवडक ५० महिलांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. यात सातपुड्याच्या आदिवासी भागात वन हक्कासाठी झटणाऱ्या झिलाबाई वसावे, मराठवाड्यात जलसाक्षरतेसाठी झटणाऱ्या सुमनबाई देशमुख यांचाही समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...