आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात विवाहितेला नेले मुलासह पळवले; दोन महिलांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून तांबापुरा येथील 32 वर्षीय विवाहितेला मुलासह पळवून नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणात विवाहितेच्या घरच्यांनी स्वत: पुढाकार घेत तपास केल्यामुळे संशयितांना ताब्यात घेतले आहे.

तांबापुरा येथील योगिता (बदललेले नाव) ही विवाहिता तिच्या 12 वर्षीय मुलासोबत राहत होती. हातमजुरी करणार्‍या विवाहितेला कंजरवाड्यात राहणार्‍या दिनेश सरदार या 22 वर्षीय मुलाने रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मी स्वयंपाक तयार करण्याचे ठेके घेत असून वेळप्रसंगी ऑर्डर असल्यास बाहेरगावी जाऊन काम करावे लागते, असे त्याने योगिताला सांगितले होते. फेब्रुवारी महिन्यात दिनेशने योगिता आणि तिच्या मुलाला मध्य प्रदेशातील भिकनगाव येथे घेऊन गेला; मात्र तो आतपर्यंत परतलाच नाही. गेल्या आठ दिवसांपूर्वी दिनेशच्या मोबाइलवरून योगिताच्या मुलाचा योगिताच्या मोठय़ा बहिणीला फोन आला होता. या वेळी त्याने ‘माझी आई घरी आली आहे का? अशी विचारणा करत, मला तीन जण मारहाण करीत आहेत’ असे म्हणत फोन बंद केला. या फोनवरून योगिताच्या घरच्यांना धक्का बसला. योगिता मुलासह अडचणीत असल्याचे लक्षात आल्यानंतर योगिताच्या नातेवाइकांनी थेट मध्य प्रदेश गाठले. तांबापुरा येथून दोन महिन्यांपूर्वी दोन मुली बेपत्ता झाल्याची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

असा झाला उलगडा : योगिताची मोठी बहीण, आई, भाऊ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिसांना योगिताच्या मुलाच्या फोनबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मोबाइल ट्रॅकरवरून हा फोन मध्य प्रदेशातील भिकनगाव या गावातून वापरला गेला असल्याचे कळले. त्यामुळे सर्वांनी भिकनगाव गाठले; मात्र तोपर्यंत दिनेशने येथून पलायन केले होते. भिकनगाव येथील पोलिसांनी दिनेशबद्दल आधीही गुन्हे दाखल असल्याचे सांगितले.