आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या तिजोरीची किल्ली गृिहणींच्या हाती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विधानसभानिवडणुकीनंतर महापालिकेतील सत्ताकारणानेही अचानक बदल घेतला असून खान्देश विकास आघाडीने स्थायी समिती निवडणुकीत ऐनवेळी माघार घेत पालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या भाजपच्या हाती सोपवल्या आहेत.पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या प्रथमच महिलेच्या हाती आल्या असून भाजपच्या ज्योती चव्हाण यांची स्थायी समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. महिला आणि बालकल्याण समिती सभापतिपदी मनसेच्या पद्मा सोनवणे यांची िनवड झाली आहे. महापौरपदापाठोपाठ स्थायी समिती सारख्या महत्त्वाच्या पदावरही महिलेची निवड झाल्यामुळे पालिकेच्या चाव्या गृहिणींच्या हाती गेल्या अाहेत.

पालिकेत बुधवारी दाेन्ही समितीच्या सभापतिपदांसाठी निवड प्रक्रिया झाली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल हाेत्या. व्यासपीठावर अायुक्त संजय कापडणीस, उपायुक्त अविनाश गांगाेडे, गाेपासिंग राजपूत हाेते. स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपच्या ज्याेती चव्हाण अाणि खाविअाचे उमेदवार िनतीन बरडे यांनी अर्ज भरले हाेते. निवड प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्या वेळी खाविआचे सभागृह नेते नितीन लढ्ढा उठून उभे राहिले त्यांनी खाविआ स्थायी समिती निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले. शहर विकासासाठी भाजपला सहकार्य करा असे आवाहन भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे खाविआ स्थायी समिती निवडणुकीतून माघार घेत असल्याचे ते म्हणाले. खाविअा उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने सभापतिपदी ज्याेती चव्हाण यांची बिनविराेध निवड झाली. महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी खाविअाच्या संगीता दांडेकर तर मनसेच्या पद्मा साेनवणे यांच्यात लढत हाेती. स्थायीप्रमाणे महिला बालकल्याण समितीतही सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी माघार घेत साेनवणे यांच्या बिनविराेध निवडीचा मार्ग माेकळा केला.

बरखास्तीची भीती टळली
पालिकाबरखास्तीची चर्चा सुरू असल्याने नगरसेवकांमध्ये भीतीचे वातावरण हाेते. यानिमित्ताने वर्षभर पालिका बरखास्तीची भीती टळणार अाहे. िनधीअभावी शहरातीलविकास कामे रखडली हाेती, ती सर्व मार्गी लागतील अशी अपेक्षा अाहे. नितीनलढ्ढा, सभागृहनेता,खाविअा

सुरुवातीपासूनहाच अाग्रह
राजकीयमतभेदामुळे शहराच्याविकासाला खीळ बसत हाेती.त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे, असा अापला सुरुवातीपासून अाग्रह हाेता. उशिरा का हाेईना सर्व एकत्र अाल्यानेविकासामधील अडथळे दूर हाेतील. अश्विनीदेशमुख, राष्ट्रवादीनगरसेविका

शहराच्या विकासासाठी निर्णय
जळगावशहराच्याविकासासाठी पक्ष भेद बाजूला सारून सर्वांनी एकत्र यावे, असा िवचार यापूर्वीदेखील सुरू हाेता. रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने हा िनर्णय घेण्यात अाला अाहे. ललितकाेल्हे, मनसेगटनेते

सत्ताधाऱ्यांना मदत करू
पालिकेच्याबाहेर पक्षीय भूमिका कदाचित वेगवेगळी असेल. मात्र, शहराच्या विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरावा, अशी नागरिकांची अपेक्षा हाेती. स्थायी समाेर सत्ताधाऱ्यांनाविकासाचा विषय मांडल्यास त्यांना मदत करण्याची भूमिका राहील. सुरेशभाेळे, अामदारभाजप

स्थायी सभापतिपदी ज्याेती चव्हाण यांची निवड झाल्यानंतर अानंदाने भारावलेली मुलगी रूचा चव्हाण िहची अाईने व्यासपीठावर अशी गळाभेट घेतली हाेती.
नगरसेवक ललित काेल्हे व्यासपीठावरून खाली पडत असताना त्यांना मनपाविरोधी पक्षनेते वामनराव खडके यांनी आधार दिला.