आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Womens Leading To Jalgaon Municipal Corporation News In Marathi

कारभारणींच्या हाती जळगाव शहराचा कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाचलाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहराचा कारभाराचा गाडा आता खऱ्या अर्थाने महिलांच्या हाती आला आहे. बुधवारी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी ज्योती चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षपदानंतर स्थायी समिती सभापतिपदावरही महिलाच विराजमान झाली आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पदांवर एकाचवेळी महिला विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महापौर राखी सोनवणे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रयाग कोळी यांच्यासोबतच जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सुनंदा पाटील या काम पाहात आहेत. त्यापाठोपाठ आता ज्योती चव्हाण यांची सभापतिपदी निवड झाली आहे.

स्रीभ्रूणहत्या, सततचे महिला अत्याचार, मुलींचे घटते प्रमाण या सर्व नकारात्मक गोष्टी दररोजच आपल्या कानावर पडतात या सर्व पार्श्वभूमीवर जळगावातील ही घटना सुखद धक्का देणारी आहे. विशेष म्हणजे या महापौर, जिल्हाधिकाऱ्यांपासून ते जिल्हा क्रीडा अधिकारी या सर्वच पदांवर काम करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. स्थायी समिती सभापती झालेल्या ज्योती चव्हाण यांच्या हाती मनपाची खडखडाट तिजोरी पडली आहे. तर प्रयाग कोळी यांच्याकडे महिला राखीव आरक्षणाचे पाठबळ असल्याने आपोआपच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद चालून आले त्यामुळे त्या नशीबवान ठरल्या असल्या तरी जि.प. सभागृह चालवताना त्यांची दमछाक झाली होती. तर महापौर राखी सोनवणे यांचा सभागृहातील वावर आत्मविश्वासपूर्ण असतो. जिल्हाधिकाऱ्यांनी सुमारे वर्षभराच्या जळगावातील आपल्या कारकिर्दीत काही चांगले निर्णय घेऊन ठसा उमटवला आहे.

कायापालट घडवण्याची जबाबदारी
विकासकामेठप्प असलेल्या जळगाव शहराचा कायापालट घडवण्याची जबाबदारी या महिला अधिकारी पदाधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे. विकास कामात अधिकारी महिला हिरिरीने पुढाकार घेतात असे दिसून येते; मात्र राजकीय क्षेत्रात महिला पदाधिकाऱ्यांचा कारभार त्यांचे पती महोदय पाहात असल्याचा प्रत्यय ठिकठिकाणी दिसून येतो या परंपरेला फाटा देण्याची संधी महापौर, स्थायी समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षांना आहे.