आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women's Studies Center Organized National Conferance

माध्यमांमध्ये स्त्रियांच्या प्रतिमा दुय्यम, विद्यापीठ परिषदेत सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वैश्विकीकरणानंतर माध्यमांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्यात स्त्रियांच्या बहुसंख्य प्रतिमा साचेबंद, दुय्यम दर्जा देणाऱ्या आणि पुरुषी मानसिकतेचे समर्थन करणाऱ्या दाखवल्या जात आहेत. त्यावर या प्रतिमा रंगवणाऱ्या मालिका बघणे हा उपाय असून, त्यासाठी प्रेक्षक आणि वाचकांचा दबावगट निर्माण करणे गरजेचे आहे, असा सूर ‘स्त्री आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत निघाला.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्त्री-अभ्यास केंद्रातर्फे अधिसभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात अाले आहे. दिग्दर्शक सुनील सुखटणकर यांनी परिषदेचे उद‌्घाटन केले. अधिष्ठाता डॉ.आसाराम पैठणे अध्यक्षस्थानी होते.

प्रतिमा‘डी-कोड’ करणे गरजेचे-
यापरिषदेत सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे बीजभाषण सुखटणकर यांनी वाचून दाखवले. त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकल्या नाहीत. मात्र, आपल्या बीजभाषणात भावे यांनी चित्रपट वा मालिकांमधून स्त्रियांची प्रतिमा कशी रंगवली जाते, हे विशद केले. स्त्रियांच्या निर्णयातून झालेले बदल व्यक्तिगत पातळीवर राहता समतेच्या आंदोलनातील महत्त्वाचे सामाजिक टप्पे ठरले आहेत. मात्र, माध्यमांमधून तशी दखल घेतली गेली नाही. पोथ्या-पुराणांमधील देव प्रेषितांच्या लिखित आणि मौखिक परंपरा जपत, बदलत माणसाने जिवंत ठेवल्या आहेत. विशेषत: स्त्रियांना दबावात ठेवता येईल अशा गोष्टी कुटुंब समाज पटकन स्वीकारतो आणि तो साचा नवनव्या कथांमधून लोकप्रिय होत साचेबंद प्रतिमा लोकप्रिय होऊ लागतात. मात्र, त्यातील स्त्रियांच्या बहुसंख्य प्रतिमा स्त्री समानतेला हिणवणाऱ्या आहेत. त्यामुळे या प्रतिमा ‘डी-कोड’ करायला शिकायला हवे, असेही त्यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात प्रा.के.व्ही.नागेश यांनी ‘महिला, चित्रपट आणि राष्ट्र’ विषयावर अाणि प्रा.कुंदा पी.एन.यांनी ‘महिलांच्या सशक्तीकरणात माध्यमांची भूमिका’ विषयावर भाष्य केले. या वेळी प्रा.अर्चना देगावकर अध्यक्षस्थानी होत्या. बुधवारी प्रा.जयदेव डोळे, चारुशीला ओक, योजना बहाळकर भिला ठाकरे यांचे व्याख्यान होणार आहे.

विद्यापीठात राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करताना दिग्दर्शक सुनील सुखटनकर. डावीकडून प्रा. डाॅ. शाेभा शिंदे, प्रा. डाॅ. ए. एस. पैठणे, प्रा. डाॅ. अर्चना देगावकर, प्रगती बाणखेले, प्रा. के. व्ही. नागेश अादी.
सकारात्मक बातम्या वाढाव्यात
परिषदेच्याउद‌्घाटनानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांनी ‘मुद्रित माध्यमांतील स्त्रियांचे चित्रण’ आणि सुनील सुखटणकर यांनी ‘छोट्या पडद्यावरील स्त्रियांचे चित्रण’ यावर मते मांडली. या वेळी प्रा.ज्योत्स्ना मेश्राम अध्यक्षस्थानी होत्या. पत्रकार बाणखेले यांनी मुद्रित माध्यमांमध्ये स्त्रियांच्या वृत्तांना सात ते दहा टक्के जागा दिली जाते, जी तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे सकारात्मक बातम्यांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे असे सांगताना त्यांना ‘निर्भया’ आणि ‘शक्ती मिल’ प्रकरणात माध्यमांनी अत्यंत जबाबदारीने आदर्श वृत्तांकन केल्याचेही सांगितले. दिग्दर्शक सुखटणकर यांनी मालिकांद्वारे स्त्रियांमध्ये भीती वाढवण्याचे काम केले जात आहे. तसेच बातम्यांमध्ये आक्रमकता येत असून, प्रत्येक गोष्टीला इव्हेंटचे स्वरूप दिले जात आहे. यासह प्रेक्षक कृतीप्रवण होणार नाहीत याचीही काळजी घेतली जाते. त्यावर अशा मालिका बघू नये हाच उपाय असल्याचे ते म्हणाले.