आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातगाडी ढकलताना कामगार पडला १५ फूट खोल चेंबरमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गोलाणी मार्केटच्या मागील बाजूने चायनीजची हातगाडी लोटत असताना एक कामगार शुक्रवारी दुपारी ४.४५ वाजेच्या सुमारास १५ फूट खाेल चेंबरमध्ये पडून जखमी झाला.
मनोज बसनेर हा खाऊ गल्लीत असलेल्या मौर्या चायनीजच्या गाडीवर कामाला आहे. सायंकाळी तो गोलाणी मार्केटमधून गाडी ढकलत घेऊन चालला होता. दरम्यान, त्याचा तोल गेल्याने तो १५ फूट असलेल्या चेंबरमध्ये पडला. चेंबरला असलेल्या कड्यांना धरून त्याने वर चढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून काही युवकांनी तेथे धाव घेत त्याला वर काढले. या दुर्घटनेत मनाेजच्या डोक्याला कोपराला मार लागला आहे.