आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमण्ड कंपनीमध्ये २५० कर्मचारी तळ ठोकून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेमण्डकंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून वेतनवाढ करार करावा. या मागणीसाठी २५० कर्मचारी दांन दिवसांपासून कंपनीत तळ ठोकून बसले आहेत. ते गुरुवारी रात्रीपर्यंत कंपनीतून बाहेर पडलेले नव्हते. अशी माहिती कर्मचारी किरण खडके यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

पाच वर्षांपासून पगारवाढीचा करार होत नसल्यामुळे सोमवारी दुपारी वाजेपासून रेमण्ड कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. सुरुवातीचे दोन दिवस कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली नाही. परंतु शिफ्टनुसार कर्मचारी कामावर येत होते पण काम करीत नव्हते. तसेच पुन्हा दुसऱ्या दिवशीही वेळेवर येत होते. मात्र, बुधवारी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना आत जाऊ दिल्याने वाद चिघळला आहे. आतील कर्मचारी जर बाहेर पडले तर व्यवस्थापनाकडून कंपनीला कुलूप लावण्यात येईल, वेतनवाढीचा करार होणारच नाही. या कारणामुळे बुधवारी सकाळी ड्यूटीवर गेलेल्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांनी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

शांतताराखण्याचे आवाहन
गुरुवारीआत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व्यवस्थापनाचा काहीसा दबाव असल्याचे दिसून आले. ते तार कंपाउंडजवळ येऊन बाहेर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करीत असताना सुरक्षा रक्षक वारंवार हटकत होते. मात्र, आपले आंदोलन हे सनदशीर मार्गाने सुरू असून आपण प्रशासनाशी चर्चा करण्याचा पर्याय ठेवला आहे. त्यामुळे बाहेर असलेल्यांनी गोंधळ घालता वाट पहावी, असा निरोप आतील कर्मचाऱ्यांनी दुपारी वाजता दिला.

तारकंपाउंडवरून जेवणाच्या पिशव्या
आतीलकर्मचाऱ्यांनी बाहेर येण्याचा निर्णय घेतला आहे. तर बाहेर असलेल्यांना सुरक्षा रक्षक आत जाऊ देत नाही. त्यांची भूक भागवण्यासाठी बाहेरील कर्मचाऱ्यांनी तार कंपाउंडवरून आहेत जेवणाच्या पिशव्या दिल्या.
रेमण्ड कंपनीच्या बाहेर उभे असलेले कर्मचारी संघटनेचे पदािधकारी.

दांन-तीन दिवसांत तोडगा
- रेमण्डकामगार आहेणि व्यवस्थापनात कराराच्या मुद्यावरून चर्चा सुरू आहे. दांन-तीन दिवसांत यावर तोडगा निघेल. एकनाथखडसे, महसूलमंत्री तथा खान्देश कामगार संघटना मार्गदर्शक

लवकरच मार्ग निघेल
- जिंदासंघटनेत रेमण्ड आहेजीवन सदस्य आहे. कामगार व्यवस्थापनात नवीन कराराच्या मुद्यावरून सुरू असलेला वाद लवकरच निघेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, लवकर तोडगा निघाल्यास संघटना म्हणून कामगार व्यवस्थापनाच्या हिताचा विचार करून मध्यस्ती करण्यासंदर्भात विचार करेल. भुवनेश्वरिसंग, अध्यक्ष, जिंदा