आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार संघटनेचा विस्तार जिल्हाभरात वाढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरासह तालुक्यातील बांधकाम कामगारांनी संघटित होऊन शासनाकडून अनेक मागण्या पदरात पाडून घेतल्या आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हास्तरावरील कामगारांनाही त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांनी एकसंघ होण्याचा ठराव रविवारी झालेल्या बांधकाम कामगार परिषदेत करण्यात आला. जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील बिल्डिंग, पेंटर, खोदकाम करणारे, फिटिंग, टाइल्सवाले कारागीर, प्लंबर आदी नोंदीत व बिगरनोंदीत कामगारांची ही परिषद श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून अभियंता शंभू पाटील, आर्किटेक्ट शिरीष बर्वे उपस्थित होते. शंभू पाटील यांनी कामगार एकसंघ होत असल्याचा आनंद व्यक्त केला. यामुळे कल्याणकारी मंडळाचे लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिरीष बर्वे यांनीही संघटनेचे प्रस्थ वाढवून शासनाकडून प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कामगार पाल्यांना दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचेही आवाहन केले. विजय पवार यांनी प्रास्ताविक केले. अनिल कोळी, चिरागोद्दीन मिस्त्री, अनिल सपकाळे, रामलाल मिस्त्री, नाना ठाकरे यांनी नियोजन केले.